Dnyaneshwar Katke Fitness Story: शिरुरचे आमदार रोजच्या धावपळीच्या आयुष्यातही जपतात फिटनेसचा 'हा' मंत्र

Political Leader Fitness : कुटुंबात आजोबा तसेच वडिलांपासून कुस्तीची परंपरा असून मलाही फिटनेसची आवड आहे. रोजच्या व्यायामामुळेच सतत उत्साही राहून आत्मविश्वासासह दिवसभर ऊर्जाही मिळते. त्यामुळे कामामुळे कुठेही असलो तरी व्यायामात मात्र कधीच अंतर पडू न देता वेळेवर सात्त्विक आहारही घेण्याचा माझा प्रयत्न असतो.
Dnyaneshwar Katke
Dnyaneshwar KatkeSarkarnama
Published on
Updated on

कुटुंबात आजोबा तसेच वडिलांपासून कुस्तीची परंपरा असून मलाही फिटनेसची आवड आहे. रोजच्या व्यायामामुळेच सतत उत्साही राहून आत्मविश्वासासह दिवसभर ऊर्जाही मिळते. त्यामुळे कामामुळे कुठेही असलो तरी व्यायामात मात्र कधीच अंतर पडू न देता वेळेवर सात्त्विक आहारही घेण्याचा माझा प्रयत्न असतो.

आरोग्य जपण्यासाठी पुरेसा व्यायाम, सात्त्विक आहार व पुरेशी विश्रांती हाच फिटनेसचा मंत्र आहे. शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माउली कटके (Dnyneshwar Katke) आपल्या फिटनेसचे रहस्य उलगडत होते.

कुस्ती क्षेत्रात नॅशनल व इंटरनॅशनल चॅम्पियन म्हणून ओळख मिळवतानाच आजोबा किसनराव कटके, तसेच वडील पैलवान पंढरीनाथ कटके यांचा कुस्तीक्षेत्राबरोबरच समाजकारण व राजकारणाचाही वारसा या क्षेत्रात सक्रीय राहून जपला आहे. राजकारणात वाघोली ग्रामपंचायत कार्यक्षेत्र व त्यानंतर वाघोली-आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषद सदस्य म्हणून गटाचे प्रतिनिधित्व करताना अनेक विकासकामांना चालना दिली.

विधानसभा निवडणुकीत झालेल्या राजकीय परिवर्तनानंतर शिरुर-हवेलीच्या जनतेने आमदारपदाची जबाबदारी मोठ्या विश्वासाने माझ्या खांद्यावर दिली आणि मीही मनापासून ती जबाबदारी स्वीकारल्याने रोजच्या कामात व जनसंपर्कातही प्रचंड वाढ झाली. मात्र, काम व जनसंपर्क वाढला तरीही रोजच्या या धावपळीच्या दिनक्रमात मी माझ्या फिटनेसकडे दुर्लक्ष होवू दिले नाही.

फिटनेससाठी पहाटे ५.३० वाजताच उठून दररोज किमान तासभर नियमित व्यायामासाठी वेळ देतो. कामानुसार कुठेही असलो तरी व्यायामात मात्र कधीच अंतर पडू देत नाही. तसेच योग्य आहार व वेळेवर जेवण घेण्याचाही माझा प्रयत्न असतो.

Dnyaneshwar Katke
Disha Salian case : ‘’खिशात भिजणारे राजीनामे आता तरी बाहेर काढा आणि ...’’ ; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ठाकरे पिता-पुत्रास चॅलेंज!

कुस्ती क्षेत्रात नॅशनल चॅम्पियन म्हणून यशानंतर समाजकारण व राजकारणात काम करतानाही माझी पहिली आवड ही फिटनेस व कुस्ती खेळ हीच आहे. त्यामुळे कुस्तीसह विविध खेळाचीही आवड जोपासत वयाच्या ४७ व्या वर्षीही स्वतःचे फिटनेस जपण्यासाठी मी सतत दक्ष असून माझे वजनही नियंत्रणात ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो.

कुस्तीक्षेत्राची व व्यायामाची आवड असल्याने रोजचा व्यायाम, कसरत असतेच. तसेच क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलिबॉलसारख्या मैदानी खेळांचीही आवड असल्याने शक्य होईल, त्यावेळी मित्रांसोबत आवर्जून या खेळांमध्ये सहभागी होतो. कटके परिवारात कुस्ती क्षेत्राच्या व व्यायामाच्या आवडीमुळेच हिंदकेसरी अभिजित कटकेसारखे मल्ल घडले आहेत.

Dnyaneshwar Katke
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार; विधानसभेवेळी परळीत काय घडलं? निलंबित होताच पीएसआयने सगळंच सांगितलं

दिवसाची सुरुवात व्यायामानेच...

रोजच्या कामात कितीही व्यग्र असलो, तरीही दिवसाची सुरुवात मात्र कटाक्षाने नियमित व्यायामाने करतो. रात्री झोपण्यास उशीर झाला तरीही, पहाटे मात्र ठरल्या वेळेवर उठतो. नेहमीच्या ठरलेल्या जिममध्ये जाऊन वर्कआऊट करतो.

अथवा बाहेर असल्यास नेहमी कुस्तीच्या सवयीप्रमाणे जोर, बैठकांसह व्यायाम व योग प्राणायामासह इतर स्ट्रेचिंगचे व्यायामही करतो. त्यानंतरच नियमित कामांना सुरुवात करतो. पहाटे व्यायाम, चांगला आहार व पुरेशी विश्रांती या बाबींचे नियोजन सांभाळून फिटनेस ठेवण्यास प्राधान्य देतो.

रोजच्या आहारावरही नियंत्रण

रोजच्या आहारात मी घरच्या सात्विक जेवणाला प्राधान्य देतो. हॉटेलचे मसालेदार खाणे तसेच चहा, कॉफी कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न असतो. सकाळी ज्यूस, फळे, तसेच बदामाच्या थंडाईला प्राधान्य देतो.

दिवसभरात नाश्ता, दुपारी जेवण व रात्रीचे जेवण असा सात्विक आहार घेताना त्यात ज्वारीची भाकरी, पालेभाज्यांचा समावेश असतो. दिवसभरात घराबाहेर असताना दुपारी व सायंकाळच्या जेवणाच्या वेळा सांभाळणे अवघड होत असल्याने सोबत घरच्या जेवणाचा डबा असतोच.

Dnyaneshwar Katke
Raigad Guardian Minister: रायगडचा तिढा आजच सुटणार...? खुद्द शर्यतीतील मंत्र्यांनीच दिले मोठे संकेत

व्यायाम, आहार, विश्रांती हाच मंत्र

बदलत्या जीवनशैलीत व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार व मोबाईलच्या अतिवापरामुळे आरोग्याच्या समस्या वाढत असून नव्या पिढीने वेळेतच याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. मैदानी खेळ तसेच रोजच्या व्यायामामुळेच कामात उत्साह राहून दिवसभर उर्जा मिळते. त्यामुळे दैनंदिन जीवनात आरोग्य जपण्यासाठी पुरेसा व्यायाम, खेळ, वेळेत चांगला सात्विक आहार व पुरेशी विश्रांती हाच फिटनेसचा मंत्र उपयुक्त ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com