Rahul Dikhle: उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवशी कॅन्सरचे निदान; राहुल ढिकलेंनी आजाराला असे केले 'पराभूत'

Nashik East MLA Adv. Rahul Dikhle promoting fitness and exercise: कॅन्सरमधून बरे झाल्यानंतर मी नव्याने व्यायामाला सुरुवात केली. आपल्याला पहिल्यासारखे दिसायचे आहे. नवा जन्म मिळाला आहे.
Nashik East MLA Adv. Rahul Dikhle
Nashik East MLA Adv. Rahul Dikhle Sarkarnama
Published on
Updated on

माझा जन्म गोकुळाष्टमीचा आहे. मी श्रीकृष्णाबरोबरच भगवान शंकर, श्रीराम यांचाही भक्त आहे. प्रभू श्रीराम आले तेथे महाबली हनुमानही आहे. त्यामुळे महाबली हनुमानाप्रमाणे व्यायामाचा छंदही मी जोपासला आहे. व्यायामामुळे शरीर पिळदार होते, तसे संघर्ष करण्यासाठी शक्तीही मिळते. त्यामुळेच, तीन वेळा मोठ्या आजारांनी घेरले असतानाही, त्यावर मात करण्यामध्ये यश आले आहे, असे सांगत नाशिक पूर्वचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी व्यायाम आणि आरोग्याचे महत्त्व सांगितले.

नाशिक पूर्व मतदारसंघातून दुसऱ्यांदा मी निवडून आलो. त्यावेळी भाजपकडून मला उमेदवारी जाहीर झाली, त्याच दिवशी तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर आहे, असे निदान डॉक्टरांनी केले होते. निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी बायप्सी झाली. या परिस्थितीतही मी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर केमोथेरपी सुरू झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माझ्या कुटुंबातील सदस्य वगळता अन्य कोणालाही या आजाराची कल्पना नव्हती. या परिस्थितीतही प्रचारासाठी मी दररोज साधारण वीस किलोमीटर पायी फिरायचो. सर्व प्रकारे प्रचार करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कला. या निवडणुकीत मी ८८ हजार मतांनी निवडून आलो. निवडून आल्यानंतरही माझ्यावर तीन केमोथेरपी झाल्या. आता आजार पूर्णपणे बरा झाला आहे. यापूर्वी बायपास व मेंदू अशा दोन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

Nashik East MLA Adv. Rahul Dikhle
Marathi leaders in Delhi: मराठी नेत्यांचा दिल्लीत दबदबा आहे का? देशासाठी काय केले?

मी मुळात पैलवान आहे. सातवी-आठवीपासून मी नाशिकच्या दांडेकर तालमीत व्यायाम करायचो. राज्यात अनेक कुस्त्याही जिंकल्या आहेत. दररोज दोन तास व्यायाम करणे ही माझी आवड. केमोथेरपीमुळे शरीराची ठेवण बदलली, केस गळाले. मात्र कॅन्सरमधून बरे झाल्यानंतर मी नव्याने व्यायामाला सुरुवात केली. आपल्याला पहिल्यासारखे दिसायचे आहे. नवा जन्म मिळाला आहे. नव्या उमेदीने काम करायचे आहे, ही उमेद मनात होती. त्यासाठी पुन्हा दररोज दोन तास व्यायाम सुरू केला आहे.

व्यायामाची मला लहानपणापासूनच आवड आहे. त्यासाठी पहाटे तालमीत जायचो. घरी आल्यावर प्रोटीनयुक्त थंडाई घ्यायचो. शाळा, कॉलेज झाल्यानंतर सायंकाळी पुन्हा दोन तास तालमीत व्यायाम करायचो. नगरसेवक, स्थायी समिती सभापती, आमदार झालो, तरी व्यायाम बंद केला नाही. कामाच्या व्यापात व्यायामाची पद्धत बदलली. कधी चालणे, पोहणे तर कधी सायकलिंगही करतो.

तीन जीवघेण्या आजारातून सुखरूप बाहेर पडलो. अजून काय हवे? व्यायामामुळेच शक्य झाले. व्यायामामुळे शरीर पिळदार तर झालेच, आत्मिक शक्ती वाढली. त्या आत्मिक शक्तीच्या बळावरच मी आजारांना सामोरे गेलो. लोक भेटतात तेव्हा म्हणतात, ‘तुला कॅन्सर होता त्यावेळी समजले नाही व तू समजूही दिले नाही. हे कसे?’ त्यावेळी व्यायामाच्या माध्यमातून संघर्ष करण्याची ताकद मिळाल्याचे मी अभिमानाने सांगतो

Nashik East MLA Adv. Rahul Dikhle
Prakash Deole : गोपीनाथ मुंडेंची खेळी अन् बाळासाहेबांचा मास्टरस्ट्रोक; शेवटच्या काही मिनिटांत अर्ज भरून प्रकाश देवळे आमदार झाले!

माझ्या पिळदार शरीराने कॅन्सरला हरविले आहे. त्यामुळे आता माझी जबाबदारी पुन्हा शरीराला साथ द्यायची आहे. त्यामुळेच आता नव्याने व्यायाम सुरू केला आहे. वेळ मिळेल तसा जिममध्ये जातो. सुरुवातीला हलका क्रॉस फीट, टायरवर हातोडे मारणे, दोरी उड्या असे व्यायाम करतो. त्यानंतर नियमित डिप्स, डंबेल्स व प्रोग्रामनुसार चेस्ट, थाइज,

शोल्डर असा व्यायाम करतो. ध्यानधारणाही करतो. जेवणाचे पथ्य पाळतो. नियमित आरोग्य तपासणी करतो. व्यायामाने मला शारीरीक व आत्मिक शक्ती मिळाली आहे. त्यातूनच संघर्ष करण्याची शक्तीही मिळाली आहे.

(शब्दांकन : विक्रांत मते, नाशिक)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com