Raigad Guardian Minister: रायगडचा तिढा आजच सुटणार...? खुद्द शर्यतीतील मंत्र्यांनीच दिले मोठे संकेत

Bharat Gogawale Vs Aditi Tatkare : रायगडच्या पालकमंत्रिपदावर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते मंत्री भरत गोगावले यांनी या पदावर आपला दावा सांगितला आहे. तर दुसरीकडे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी देखील जिल्ह्याचं पालकत्व आपल्यालाच मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
devendra fadanvis, bharat gogavale, aditi tatkare
devendra fadanvis, bharat gogavale, aditi tatkare Sarakarnama
Published on
Updated on

Raigad News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केल्यानंतर रायगडचं पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांच्याकडे गेलं होतं. मात्र,त्यावरून मोठा वादंग झाला. शिंदेंच्या नेत्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केल्यामुळे 24 तासांच्या आत हा निर्णय मुख्यमंत्र्यांना मागे घ्यावा लागला होता. तेव्हापासून आजतागायत रायगडचा पालकमंत्रिपदाचा निकाल लागलेला नाही.पण यातच मंत्री व शिवसेनेचे नेते भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी हा मुद्दा आजच निकाली लागणार असल्याचं विधान करत खळबळ उडवून दिली आहे.

वाशिमच्या पालकमंत्रिपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्तीची घोषणा झाल्यानंतर आता रायगडच्या पालकमंत्रिपदावरही पडदा पडणार असल्याची शक्यता आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यापासून रायगडचं पालकमंत्रिपद (Raigad Guardian Minister) शिदेंच्या शिवसेनेला मिळणार की अजितदादांच्या राष्ट्रवादीला मिळणार? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं. शिवाय पालकमंत्रिपद आम्हालाच मिळणार असा दावा देखील दोन्ही पक्षांकडून केला जात होता. त्यातच बुधवारी(ता.26) भरत गोगावले यांनी मोठं विधान केलं आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या स्नेहल जगताप यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्या भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती.पण अखेर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणून अजित पवारांसह प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरेंनी मोठी खेळी खेळली आहे. पण त्याचवेळी आता भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा आजच रात्री सुटणार असल्याची माहिती दिल्याचे समोर येत आहे.

devendra fadanvis, bharat gogavale, aditi tatkare
Devendra Fadnavis: अधिवेशनाचे सूप वाजण्याच्या काहीक्षण आधी फडणवीसांनी काढला आणीबाणीचा मुद्दा; भावनिक होत म्हणाले...

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा शिंदेंच्या शिवसेनेचे नेते मंत्री भरत गोगावले यांनी या पदावर आपला दावा सांगितला आहे. तर दुसरीकडे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी देखील जिल्ह्याचं पालकत्व आपल्यालाच मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यातच काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रायगडचे पालकमंत्रीपद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला द्यावे अशी मागणी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com