Abdul Sattar : अब्दुल सत्तारांना शिक्षण मंत्री करतील... पृथ्वीराज चव्हाणांची खोचक टीका

सध्या दोनच Two Ministers मंत्र्यावर सरकार Government सुरू आहे, मंत्री मंडळाच्या निर्णयासाठी किमान 12 मंत्री लागतात. त्यामुळे या दोघांनी घेतलेले निर्णयही बेकायदेशीर decision is also illegal ठरतील.
Abdul sattar, Prithviraj Chavan
Abdul sattar, Prithviraj Chavansarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : टीईटी घोटाळ्यात माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलांचा समावेश असल्याचं समोर आल्यानंतर ते सरकारमध्ये आहेत, कदाचित त्यांनाच शिक्षण मंत्री करतील, अशी खोचक टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापूरच्या काँग्रेस कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. टीईटी घोटाळ्यातील अब्दुल सत्तार यांच्या मुलांचा सहभाग असल्याच्या आरोपाबाबत श्री. चव्हाण यांना विचारले असता ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, शिंदेंनी दोन तृतीयांश आमदार फोडले खरे पण, त्यांनी विलिनीकरणाच्या कायद्याचा अभ्यास केला नव्हता. त्यामुळे आता न्यायालयात हे टिकेल असे वाटत नाही.

Abdul sattar, Prithviraj Chavan
TET Exam Scam : टीईटी गैरव्यवहारात माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलांचा सहभाग ?

सध्या दोनच मंत्र्यावर सरकार सुरू आहे, मंत्री मंडळाच्या निर्णयासाठी किमान 12 मंत्री लागतात. त्यामुळे या दोघांनी घेतलेले निर्णयही बेकायदेशीर ठरतील. पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवरही टीका केली, देशाची आर्थिक अवस्था खूप बिकट आहे, मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात कर्ज काढून ठेवले आहे, विकासदरही कमी आहे. त्यामुळे भविष्यात देशाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com