Kolhapur: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखानदारांच्या विरोधात लढाई जिंकली असली तरी आता त्यांना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कारखानदारांविरोधात पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तब्बल नऊ तास महामार्ग रोखून धरला होता. त्यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूस वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना त्याचा फटका बसला.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली पोलिस ठाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह अडीच हजार कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद केला आहे. काल (गुरुवार) महामार्ग रोखल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल केले आहेत. बंदी आदेश झुगारून आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे. शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तब्बल 9 तास पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखला होता. सकाळी १० ते सायंकाळी ७:३० वाजेपर्यंत या महामार्गावर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ठाण मांडले होते.
आंदोलनादरम्यान महामार्गावरील प्रवाशांना आणि अवजड वाहनांना जिल्हा पोलिस प्रशासनाकडून महामार्गावरील वाहतूक अन्य मार्गाकडे वळविण्यात आली होती. मात्र, त्या मार्गावरीही प्रचंड वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्यानंतर काल दिवसभर कोल्हापूर शहरासह आजूबाजूच्या पंचवीस किलोमीटर परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. रात्री साडेसात वाजल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर दीड तासाने कोल्हापूर शहरसह परिसरातील वाहतूक सुरळीत झाली.
पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन कारखानदारांनी मागणी मान्य केल्यानंतर अखेर थांबले आहे. मागील हंगामात ज्या कारखान्यांनी तीन हजारांच्या आतमध्ये दर दिला आहे, त्यांनी 100 रुपये, तर 3000 पेक्षा जास्त दर देणाऱ्या कारखान्यांनी मागील हंगामातील 50 रुपये देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहे.
(Edited By: Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.