चालीसा कुठंही म्हणू लागलात तर, संकटमोचन तुमच्या मागे लागेल...धनंजय मुंडे

देशात Contry विकासाचा, नोकरीचा Of development, of jobs मुद्दा नसतो, त्यावेळी देशात जातीं धर्मात तेढ Caste rift in religion निर्माण केली जात आहे, असा आराोप त्यांनी केला.
Dhananjay Mundhe
Dhananjay Mundhesarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : ''नवनिर्माण आणि नवनीत राणा सध्या हनुमान चालीसा वाचत आहेत. हनुमान चालीसा मातोश्री समोर नाही तर मारूतीसमोर वाचायची असते. हनुमान चालीसा तुम्ही कुठंही वाचू लागलात तर हे संकटमोचन कधी तुमच्या मागे लागेल कळणार नाही. त्यामुळे हनुमान चालीसाचे राजकारण करू नका,'' असा सल्ला राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे व राणा कुटुंबियांना दिला आहे.

Dhananjay Mundhe
शिल्लक ऊसावर तोडगा; कारखान्यांना टनाला दोनशे रूपये रिकव्हरी लॉस देणार...अजित पवार

धनंजय मुंडे म्हणाले, जास्त पिकले तरी अडचण आणि नाही पिकले तरी अडचण अशी आपली शेतकऱ्यांची जात आहे. उपटसुंभ नेते म्हणून राज ठाकरेंचा केला उल्लेख करून ते म्हणाले, ज्यांच्या विचारात रक्तात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांच्यावर तुम्ही भाषणात महाराजांचा उल्लेख नाही म्हणून आरोप करता. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर दुसऱ्यांदा कर्जमाफी माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांनी दिली.

Dhananjay Mundhe
'किसन वीर' अडचणीत आणण्यात पाटील बंधूंचाच सहभाग...मदन भोसले

महाविकास आघाडीच्या सरकारने पहिल्या अधिवेशनात उपमुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडताना दोन लाखांपर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेतला. कोविड काळात दोन वर्षे गेले. केंद्र आणि राज्याची तिजोरी खाली झाली. पण, ५० हजार नियमित भरतो ते देण्यासाठी अडचण येऊ दिली नाही. शेतकऱ्यांना निधीची कमी भासू दिली नाही. देशात विकासाचा, नोकरीचा मुद्दा नसतो, त्यावेळी देशात जातीं धर्मात तेढ निर्माण केली जात आहे.

Dhananjay Mundhe
चुकीच्या व्यवस्थापनामुळे 'किसन वीर' कारखाना अडचणीत...मकरंद पाटील

कोणी तरी म्हणतंय भोंगे उतरवा, कोणी म्हणतंय भोंगे चढवा. मी तर रोज सकाळी हनुमान चालीसा हनुमानाच्या समोर वाचल्याशिवाय कामाला सुरुवात करत नाही, असे सांगून मुंडे म्हणाले, काहीजण म्हणतात भोंगे काढा अन्यथा तेथे जाऊन चालीसा वाचू. नवनिर्माण आणि नवनीत हनुमान चालीसा वाचत आहेत. हनुमान चालीसा मातोश्री समोर नाही तर मारूतीसमोर वाचायची असते मशिदी समोर नाही. हनुमान चालीसा जर तुम्ही कुठं ही वाचू लागलात तर हे संकटमोचन कधी तुमच्या मागे लागेल कळणार नाही.

Dhananjay Mundhe
Video : सत्तेचा दुरूपयोग करणे चुकीचे : उदयनराजे

ही मंडळी आम्हाला धर्म शिकवू लागली आहेत. आमच्यापेक्षा जास्त वेळ घेऊन हनुमान चालीसा वाचून दाखवा, असे आव्हान करत यापुढे हनुमान चालीसाच राजकारण करू नका, असा इशारा त्यांनी दिला. शेतकरी विरोधात केंद्राने कायदे केले. त्याविरोधात स्वातंत्र्य भारतात ऐतिहासिक आंदोलन करून शेतकऱ्यांनी केंद्रातील मगरूर सरकारला कायदा मागे घ्यायला लावला. शेतकऱ्याने एवढं थकवल की प्रधानमंत्र्यांना डोळ्यात पाणी आणून कायदा मागे घ्यावं लागला. ही आपली ताकद आहे. शेतकऱ्यांची ताकद आहे.

Dhananjay Mundhe
आमदार गोरेंच्या अटकेसाठी राष्ट्रवादी आक्रमक; महेश तपासे घेणार सातारा एसपींची भेट...

शेतकरी पेटून उठला आणि हितासाठी लढायचे ठरविले तर भल्या भल्याला वाकवू शकतो. विश्वगुरूला ही वाकविण्याची ताकद शेतकऱ्यात आहे. सामाजिक न्याय विभागातून मी १२ कोटी दिले आहेत. राखीव मतदारसंघाला कमीत कमी विकासासाठी सामाजिक न्याय विभागाचे प्रत्येक वर्षी १० कोटी द्यावेत. पण उपमुख्यमंत्र्यांनी १२ कोटी देण्याचे आदेश दिलेत त्यातून आम्ही हा निधी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com