Maratha Reservation : मराठा आंदोलन मुंबईत धडकणारच!; जरांगेंनी अजितदादांना लगावला टोला

Maratha Reservation Mumbai Manoj Jarange Patil Statement : मुंबईतील मैदानांसाठी टीम कामाला लागल्याची जरांगे-पाटील यांची माहिती
Manoj Jarange Maratha Reservation
Manoj Jarange Maratha Reservation Sarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation Latest News In Marathi :आझाद मैदान, शिवाजीपार्क असे बरीच मैदाने आम्हाला लागणार आहेत. मैदानांसाठी आमच्या सगळ्या टीम कामाला लागल्या आहेत. घोषणा झाली की दुसऱ्या दिवशी सकाळपासून मुंबईत सभा होतील. सरकार त्यांचे काम करतंय आम्हीही कामच करतोय, असे म्हणत मराठा आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे-पाटील यांनी दिला इशारा दिला आहे. मुंबईत उपोषण करण्यावर ठाम असल्याचे जरांगे यांनी यातून स्पष्ट केले.

Manoj Jarange Maratha Reservation
Manoj Jarange Patil News: सकाळी क्रिकेट खेळले, दुपारी रुग्णालयात दाखल; जरांगे पाटलांना खोकल्याचा त्रास...

मराठा आंदोलनाच्या सहाव्या टप्पाबाबत अजून निश्चित झालेले नाही. त्या वेळापत्रकावर चर्चा सुरू आहे. सध्या मुंबईतील मैदाने बघितली आहेत. कोणत्या मार्गाने जायचे आहे, याचे काम सुरू आहे. आमच्या टीम गेलेल्या आहेत. फक्त आता समस्या दौऱ्याची आहे. आज प्रत्यक्ष बसून यावर निर्णय घेण्यात येईल आणि त्याची माहिती देण्यात येईल, असे जरांगे-पाटील म्हणाले.

मुंबईचा दौरा करणारच. कारण मराठा समाज थांबायला तयार नाही. समाजात जनजागृती करणे गरजेचे आहे. त्यामुळे मी दौऱ्यावर जाणार आहे. 20 च्या आत मुंबईत सभा घेणार आहे. त्यानंतर काही विषयच येत नाही. 20 नंतर आंदोलनाचा शेवटचा टप्पा असेल. ते मोठे आंदोलन होणार आहे, असे जरांगे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवारांना टोला

महिलेचे नाव मुलाच्या पुढे लावले जाईल. आधी मुलाचे, मग आईचे, वडिलांचे आणि मग आडनाव नाव लावले जाईल, असेही काहींनी म्हटले. मग आईची जात लावा म्हटल्यावर काय दुखते? मुलाला आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आईची जात लावली पाहिजे, हे त्यांना का दिसत नाही? तिथे त्यांचे तोंड उघडत नाही, असे म्हणत जरांगे-पाटील यांनी टोला लगावला आहे. आवाहन करूनही काही लोक मुंबईला जायला निघाले आहेत, असे अजित पवार म्हणाले होते. त्यावर जरांगे-पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली.

'मराठ्यांविरोधात मोहीम सुरू'

सगळ्या पक्षातल्या आमदारांनी, मंत्र्यांनी आणि खासदारांनी मराठा तरुणांच्या पाठिशी ताकदीने उभे राहावे. तेही प्रत्यक्षपणे. हीच वेळ आहे. नाहीतर मराठा तुम्हाला दारात उभे करणार नाहीत, असे आवाहन जरांगे यांनी केला. आमच्या विरोधात कोण-कोण मोहीम राबवतेय, मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून कोणाची मोहीम सुरू आहे? हे मराठ्यांना माहीत आहे. हे 20 तारखेनंतर कळेल, असे मनोज जरांगे-पाटील म्हणाले.

Manoj Jarange Maratha Reservation
Maratha Reservation : ‘मी कोणत्याही परिस्थितीत मॅनेज होत नाही, हीच सरकारची मोठी अडचण’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com