

कोल्हापूर : ‘दिवंगत बाबासाहेब कुपेकरांनी २०१३ मध्ये आराखड्यात सामाविष्ट केलेले ट्रॉमा केअर सेंटर व उपजिल्हा रुग्णालय जागेअभावी रखडले होते. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार हसन मुश्रीफ यांच्या सहकार्यातून पाटणे फाटा येथे जागा चार एकर जागा उपलब्ध करून घेऊन लगेचच ३२ कोटींच्या कामालाही सुरुवात केली.
हा सर्व इतिहास विरोधकांनी तपासून पाहावा आणि मग माझ्यावर आरोप करावेत. मी केवळ मी केलेल्या कामांचेच श्रेय घेतो, इतरांसारखे दुसऱ्याच्या कामांचे श्रेय लाटत नाही’, असे प्रतिपादन आमदार राजेश पाटील यांनी केले. गडहिंग्लज तालुक्यातील हुनगिनहाळ, चन्नेकुपी, हरळी, हसूरवाडी आदी गावांत प्रचार दौरा झाला. यावेळी आमदार पाटील बोलत होते.
ते म्हणाले, ‘या भागातील जनता मतदारसंघासाठी योगदान दिले आहे, त्यांचीच पाठराखण करते. इथून पुढेही राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी मी अभिवचन देतो. या निवडणुकीमध्ये ज्यांनी काहीच केले नाही ते केवळ आश्वासने देणार आहेत. या आश्वासनांच्या पावसामध्ये वाहून न जाता २० तारखेला मला मतरूपी आशीर्वाद द्यावा.’
शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यान्नवर म्हणाले, ‘राजेश पाटील यांना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सर्वोच्च भवनांमध्ये पाठवण्याची जबाबदारी घेऊया. येत्या निवडणुकीमध्ये राजेश पाटील यांना पुन्हा एकदा आमदार करूया.’
संग्रामसिंग कुपेकर म्हणाले, ‘या निवडणुकीमध्ये सुसंस्कृत लोकांच्या विचारांची धार, तालुक्यासाठी झटणाऱ्या नेत्यांची फौज राजेश पाटलांच्या पाठीशी आहे. विरोधी उमेदवारांनी तालुक्याच्या विकासासाठी काय योगदान दिले आहे, हा संशोधनाचा विषय आहे. उद्याच्या उज्वल भविष्यासाठी घड्याळ हे चिन्ह लक्षात ठेवून राजेश पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करूया.’या प्रचार दौऱ्यात सागर पाटील, ऋषीकेश पाटील, भीमगोंडा पाटील, मधुकर कुलकर्णी, तुकाराम दुंडगे, विरगोंडा देसाई, विठ्ठल चौगुले, रमेश धनगर यांनी सहभाग घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.