Kolhapur Politics News : स्वाभिमानीचं ऊसदर आंदोलन चिघळलं, निमशिरगावात अज्ञातांनी ट्रॅक्टर पेटवला !

Raju Shetti News : "कारखान्यांनी गाळप सुरू केल्याने आंदोलनाचा भडका उडाला.."
Kolhapur Polhapur News
Kolhapur Polhapur News Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Latest News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ४०० रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. गेल्या 8 दिवसांपासून राजू शेट्टी यांची आक्रोश पदयात्रा सुरू आहे. ४०० रुपये दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नयेत, असा गर्भित इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता. मात्र, अनेक कारखान्यांनी गाळप सुरू केल्याने आंदोलनाचा भडका उडाला आहे. अज्ञात कार्यकर्त्यांनी रात्री ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पेटवून दिला आहे. जोपर्यंत उसाचा हप्ता मिळत नाही, तोपर्यंत हंगाम सुरू करायचा नाही, अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Kolhapur Polhapur News
PM Modi Shirdi Visit: मोदींच्या दौऱ्याच्या नियोजनात निरुत्साह; मंत्री विखेंनी भर बैठकीत भाजप पदाधिकाऱ्यांना झापले

चिपरी (ता. शिरोळ) येथील घोडावत जॉगरी कारखान्याने उसाची पहिली उचल जाहीर न करताच ऊस तोड सुरू केली होती. आज संध्याकाळी निमशिरगाव येथून उसाची वाहतूक सुरू असताना संतप्त कार्यकर्त्यांनी उसाचा ट्रॅक्टर पेटवून दिल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे. दरम्यान, कारखानदारांनी मागणी न मान्य केल्याने पुढील काळात हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.

Kolhapur Polhapur News
Manoj Jarange Patil Hunger Strike : पवारांचा पाठिंबा, ठाकरेंचे कौतुक, शिंदेंची शपथ... तरीही जरांगे पाटील उपोषणावर ठाम!

कारखानदार व सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मागील उर्वरित 400 रुपये द्यावेत, या मागणीसाठी आत्मक्लेश पदयात्रा सुरू आहे. या माध्यमातून शेट्टी यांनी कारखानदार आणि राज्य सरकारला टार्गेट केले आहे. साखर उद्योग संकटात असतो, तेव्हा साखर कारखानदार केंद्र सरकार अथवा राज्य सरकारकडे पाठपुरावा करून धोरण ठरविण्यास असमर्थ असून ईडी , सीबीआय व इन्कम टॅक्स विभागाच्या धास्तीने सरकारकडे पाठपुरावा करण्याऐवजी शेतकऱ्यांचाच बळी घेऊन मूग गिळून गप्प बसतात.

देशातील सर्वात जास्त महसूल देणाऱ्या साखर उद्योगाकडे कारखानदार व सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

(Latest Marathi News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com