Sharad Pawar News : शरद पवारांंचा निस्सीम कार्यकर्ता पडला एकटा; भ्रमनिरास झाल्याने राजकारणाला रामराम!

NCP Kolhapur Politics : कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते देखील शिंदे यांचा आदर राखतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांच्याकडे दुर्लक्ष होत चालले आहे.
Sharad Pawar News
Sharad Pawar NewsSarkarnama

Kolhapur News : राजकारणात एक कार्यकर्ता म्हणून संपुर्ण आयुष्य खर्ची घालणारे अनेक कार्यकर्ते असतात. या कार्यकर्त्यांना पक्षाचा प्रगतीबरोबर योग्य मान सन्मान, पद प्रतिष्ठांपासून कायमच वंचित राहतो. कोल्हापूरमधल्या अशाच एका कार्यकर्त्याने संघटनेत 40 वर्षे खर्ची केल्यानंतर पक्षाला 'अखेरचा दंडवत' केला आहे. (Latest Marathi News)

ज्या ज्या वेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आलेत त्यावेळी जयकुमार शिंदे यांनी आपली जबाबदारी निष्ठेने पार पडली आहे. कधीकाळी कोल्हापुरात आल्यानंतर त्यांची बॉडीगार्ड म्हणून ही काम केले आहे. पक्ष देईल ती जबाबदारी म्हणून प्रामाणिकपणे खांद्यावर राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन प्रचारात अग्रभागी असायचा. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भावना मांडली. पक्षाचे काम प्रामाणिकपणे पार पाडून काम करत राहिलो. यामुळे कुटुंबाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. हातातोंडाशी आलेल्या मुलाने कायमस्वरूपी नोकरीच्या प्रतीक्षेत जीवन संपवलं. अशा कठीण परिस्थितीत पक्षाचे स्थानिक नेते पाठबळ देतील, अशी अपेक्षा जयकुमार शिंदे यांना होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar News
Narendra Modi Vs Sharad Pawar : PM मोदींचं शरद पवारांना चॅलेंज! 'राहुल गांधींकडून वचन घ्या की...'

मात्र या नेत्यांनीच आता मला झिडकारले आहे. त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांच्याकडून माझी अहवेल ना होत आहे. मी हतबल झालो आहे. त्यामुळेच मी पक्षाचा राजीनामा देतोय जयकुमार शिंदे यांनी जाहीर केलं. जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष जयकुमार शिंदे काम पाहत होते. इतकेच नव्हे तर राजकारणात (Election) येऊ पाहणाऱ्या नव्या कार्यकर्त्यांना देखील जयकुमार शिंदे यांनी कानमंत्र दिला आहे. घरचा चांगला असेल तरच राजकारणात पडा. रोजगार करून कुटुंब सांभाळा मगच राजकारणात या, असा सल्ला तरुण कार्यकर्त्यांना जयकुमार शिंदे यांनी दिला आहे.

नेत्यांनी लक्ष दिलं असतं तर आज माझा मुलगा जिवंत असता -

इमान इतवारे नेत्यांची सेवा करणाऱ्या जयकुमार शिंदे यांची मनाला चटका लावणारी कहाणी आहे. 35 वर्षांपासून ते राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते देखील शिंदे यांचा आदर राखतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांच्याकडे दुर्लक्ष होत चालले आहे. हातात तोंडाला आलेल्या मुलग्याला काम लागावं यासाठी नेत्यांच्या पायऱ्या झिजवल्या. पण जयकुमारला खुश ठेवण्यासाठी जिल्हा परिषद मध्ये कंत्राटी कामगार म्हणून त्याच्या मुलाला लावण्यात आले.

Sharad Pawar News
NCP Party Symbol Case : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाची सुनावणी आता जुलै महिन्यात !

मात्र पगार होत नसल्याने मागील काही महिन्यात जयकुमार शिंदे यांच्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केली. अजूनही मुलग्याचा पगार होत नाही. त्याचवेळी लोकप्रतिनिधींनी माझ्याकडे लक्ष दिलं असतं तर आज माझा मुलगा जिवंत असता अशा शब्दात जयकुमार शिंदे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com