Tembhu Scheme News : शेतकऱ्यांना दिलासा! टेंभू योजनेचे आवर्तन सुरू होणार; रब्बीतील पिकांसाठी ठरणार लाभदायक!

Suhas Babar on Tembhu Scheme : आमदार सुहास बाबरांनी दिली महत्त्वाची माहिती; खानापूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या मागणीला यश
MLA Suhas Babar and Tembhu
MLA Suhas Babar and TembhuSarkarnama
Published on
Updated on

Khanapur Constituency Farmers News : खानापूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार टेंभू योजनेचे पाणी सोडावे, यासाठी जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे आणि कार्यकारी अभियंता राजन रेडियार यांच्याशी संपर्क साधून टेंभूचे आवर्तन सुरू करण्याच्या सूचना त्यांना दिल्या आहेत. त्यानुसार ६ जानेवारीपासून टेंभू योजनेचे आवर्तन सुरू होणार असल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली.

रब्बी हंगामासह परिसरातील भाजीपाला, ऊस, डाळिंब पिकासाठी टेंभुचे आवर्तन सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. पाटबंधारे विभागाकडून परिपत्रक काढून पाणी मागणी अर्ज करावेत, असे आवाहन करूनही पाणी मागणी होत नसल्याने आवर्तन लांबणीवर पडेल अशी भीती शेतकऱ्यांमधून होत आहे. मात्र सध्या रब्बी हंगामातील पिकांची पेरणी झाली आहे. ओढे, नाले कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. पाणी प्रश्न मार्गी लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती.

पाटबंधारे विभागाने परिपत्रक काढून पाणी मागणीचे अर्ज करावेत असे आवाहन केले होते. मात्र यापूर्वी केंव्हाही पाणी मागणी करावी लागत नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांच्यात(Farmers) संभ्रामावस्था आहे. जे शेतकरी मागणी करतील त्यांच्यावर पाणीपट्टी बसेल या भितीने शेतकरी पाण्याची मागणी करत नाहीत.

MLA Suhas Babar and Tembhu
Sharad Pawar's NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तरी तारणार का?

परिसरातील तलाव, विहीर, कुपनलिकेची पाणी पातळी खालवल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पंधरा दिवस पाणी पुरेल इतकाच सध्या पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे रब्बी हंगामाचे पिकांचे काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

MLA Suhas Babar and Tembhu
Kolhapur News : भोगावती शिक्षण मंडळाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले! वादाची परंपरा यंदा खंडित होणार का?

पाणी वापर संस्थेकडून पाणी मागणी केल्यास त्या पध्दतीने नियोजन करण्यात येणार असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र मागणी नसल्यास पाणी सोडायचे कसे असा प्रश्न संबंधित विभागाला पडला आहे. शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न मिटविण्यासाठी पुढाकार घेऊन संबंधीत अधिकाऱ्यांना टेंभूचे आवर्तन सुरू करण्याच्या सूचना केल्या असल्याचे आमदार बाबर यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com