Chandrashekhar Bawankule News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 25 उमेदवार निश्चित झाले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. 25 उमेदवार आणि मतदारसंघ यांची यादी देखील काही माध्यमांनी प्रसिद्ध केली होती. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जागा वाटप करताना मेरीट हाच निकष असेल. तसेच महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा अजून सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 जागा निश्चित झाल्याचे वृत्त तथ्थहिन आहे.
महायुतीमधील नेते एकत्र बसतील. जागा वाटप निश्चित करतील. आणि जागा वाटपाची यादी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करतील, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगत अजित पवार गटाच्या जागा निश्चित झाल्याचे वृत्तात तथ्य नसल्याचे म्हटले.
चंद्रशेखर बावनकुळे हे वाशिम दौऱ्यावर होते. पत्रकारांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले, वाशिमध्ये पक्षात कुठल्याही स्वरुपाची गटबाजी नाही. मी येथे आल्याने गटबाजी संपली आहे. गटबाजी करणाऱ्यांना पक्षात स्थान नाही.
काँग्रेसने लोकसभेत खोटा प्रचार केला. त्यांचा जाहीरनामा देखील खोटारडा होता. आरक्षणाच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींना महाराष्ट्रात येऊन उत्तर द्यावे लागेल, असे देखील बावनकुळे म्हणाले.
बारामती :अजित पवार
उदगीर : संजय बनसोडे
आंबेगाव : दिलीप वळसे-पाटील
दिंडोरी : नरहरि झिरवळ
येवला : छगन भुजबळ
पुसद : इंद्रनील नाइक
वाई खंडाळा महाबळेश्वर : मकरंद आबा पाटील
पिंपरी : अण्णा बनसोडे
परळी : धनंजय मुंडे
इंदापूर : दत्ता भरणे
रायगड : अदिती तटकरे
कळवण : नितिन पवार
मावळ : सुनील शेळके
अमळनेर : अनिल पाटिल
अहेरी : धर्मराव बाबा अत्राम
कागल : हसन मुश्रीफ
खेड : दिलीप मोहिते-पाटील
अहमदनगर : संग्राम जगताप
जुन्नर : अतुल बेनके
वडगाव शेरी : सुनील टिंगरे
या जागा आणि उमेदवार अजित पवार गटाचे निश्चित झाले वृत्त प्रसिद्ध झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.