आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची कथित यादी व्हायरल आणि गृहमंत्री म्हणाले....

Social media rumors : मोक्षदा पाटील (Mokshda Patil) यांची बदली पोलीस उपायुक्त परिमंडळ २ मुंबई
Dilip Walse patil
Dilip Walse patilSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यात मागच्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर पोलिस दलातील (Maharashtra Police) ६२ उच्च अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी व्हायरल होत आहे. मात्र आता या यादीची गृहविभागाने दखल घेतली असून त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी स्पष्टीकरण देखील दिले आहे. संबंधित यादी ही बनावट असून तो एक प्रकारचा खोडसाळपणा आहे, असे गृहमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यात मागच्या ४ दिवसांपासून सोशल मिडियावर पोलिस दलातील ६२ उच्च अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असल्याचा एक मेसेज व्हायरल होत आहे. या यादीमध्ये संबंधित अधिकाऱ्याचे नाव आणि त्यांच्या बदलीचे स्थान देण्यात आले आहे.

Dilip Walse patil
लतादीदींना न्युमोनियाचीही लागण ; 'ब्रीच कॅंडी'त उपचार, 'लवकर बरे व्हा' वाळूशिल्पातून प्रार्थना

यात काही उदाहरण द्यायची झाल्यास सध्याच्या औरंगाबाद लोहमार्ग पोलिस अधिक्षक असलेल्या मोक्षदा पाटील यांची बदली पोलीस उपायुक्त परिमंडळ २ मुंबई याठिकाणी झाली आहे. कोल्हापुरचे पोलिस अधिक्षक असलेले शैलेश बलकवडे यांची बदली पोलीस अधिक्षक रायगड याठिकाणी झाली आहे, अशा प्रकारचे हे मेसेज आहेत.

Dilip Walse patil
उपमुख्यमंत्री भडकले; माईक फेकून देत पत्रकाराचा मास्क ओढला अन् व्हिडीओच केला डिलीट

मात्र व्हायरल झालेली ही यादी बनावट असल्याचे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे. ते म्हणाले, गृहविभागासमोर सध्या बदल्यांचा कोणताही प्रस्ताव नाही. याबाबत चौकशीचे आदेश यापुर्वीच देण्यात आले आहेत. सहा महिन्यांपुर्वी देखील अशीच एक यादी व्हायरल झाली होती. त्यामुळे सातत्याने असा खोडसाळपणा करणाऱ्यांविरोधात गंभीर कारवाई करण्यात येणार असून चौकशीअंती दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com