Aaditya Thackeray : राजन साळवींचा राजीनामा अन् आदित्य ठाकरे दिल्लीला रवाना, नेमकं कारण काय?

Aaditya Thackeray Heads to Delhi : आदित्य ठाकरे हे दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे दिल्ली दौऱ्यामागचे नेमके कारण काय? अशी चर्चा सुरू आहे. दिल्ली दौऱ्यात ते अरविंद केजरीवाल यांना भेटणार असल्याची चर्चा आहे.
arvind kejriwal Aaditya Thackeray
arvind kejriwal Aaditya Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Aaditya Thackeray News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आज मोठा दणका बसला. पक्षाची माजी आमदार, उपनेते राजन साळवी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ते उद्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या घडामोडी वेगाने घडत असतानाच आदित्य ठाकरे हे दिल्लीला रवाना झाले आहे. त्यामुळे दिल्ली दौऱ्यामागचे नेमके कारण काय? अशी चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे हे दिल्ली जाण्या मागचे कारण हे इंडिया आघाडीतील नेत्यांची भेट घेणे आहे. ते या दौऱ्यात इंडिया आघाडीतील वरिष्ठ नेत्यांना भेटणार आहेत. विशेष म्हणजे दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला पराभव स्वीकारावा लागला त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हे अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार आहेत.

arvind kejriwal Aaditya Thackeray
Defamation notice from Governor : मोठी बातमी! देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्यपालांनी मुख्यमंत्री अन् आमदारांना पाठवली मानहानीची नोटीस!

दिल्ली विधानसभेत काँग्रेस आणि आप स्वतंत्र्य लढल्याचा फायदा भाजपला झाला. या निवडणुकीत इंडिया आघाडी कायम राहिली असतील तर त्याचा फटका भाजपला बसला असता. पण काँग्रेस आणि आप यांच्यातील मतभेदांमुळे दिल्लीत भाजपचे सरकार आले. त्यामुळे आपल्या दिल्ली दौऱ्यात इंडिया आघाडीची मोट पुन्हा एकदा बांधण्याचे प्रयत्न आदित्य ठाकरे यांच्याकडून केले जाण्याची शक्यता आहे.

खासदारांची बैठक घेणार

आदित्य ठाकरे आपल्या दिल्ली दौऱ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांची बैठक घेण्याची शक्यता आहे. ऑपरेशन टायगरद्वारे सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदार फोडण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे. त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे बैठकीत महत्त्वाच्या सूचना करण्याची शक्यता आहे.

arvind kejriwal Aaditya Thackeray
Shaktipeeth Highway : शक्तिपीठ रद्दसाठी महिलांचा एल्गार; रक्ताने पत्र लिहीत लाडक्या मुख्यमंत्री भावाला साद

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com