
Mumbai News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील व्यंगात्मक गाण्यामुळे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा वादात सापडला आहे. हे गाणे सोशल मिडीयावर व्हायरल होताच शिवसेना आक्रमक झाली आहे. कार्यकर्त्यांनी त्याच्या स्टुडिओची तोडफोड केली असून त्याच्यावर गुन्हाही दाखल केला आहे.
यावरूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शिंदेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांवरही हल्लाबोल केला आहे. "देवेंद्रजी, तुम्ही एक कमकुवत गृहमंत्री आहात", असा टोला लगावत खासदार संजय राऊत यांनी X वर पोस्ट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. तर "सत्तेत असताना कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणे हा एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कमजोर करण्याचा आणखी एक प्रयत्न असल्याचा" म्हणत आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, मिंधेच्या भ्याड टोळीने कॉमेडी शोचा स्टेज तोडला. विनोदी कलाकार कुमार कामराने एकनाथ मिंधेंवर एक गाणे सादर केले, जे 100 % खरे आहे. एखाद्याच्या गाण्यावर अशा पद्धतीने असुरक्षित असणाराच भ्याड हल्ला करू शकतो. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे का? एकनाथ मिंधे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न केल्याचा घणाघातही त्यांनी केला
कुणाल कामरा याने आपल्या स्टँडअप काॅमेडी शोमध्ये एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली. तो म्हणाला की, आधी भाजपमधून शिवसेना फुटली. त्यानंतर शिवसेनेतून शिवसेना फूटली. नंतर राष्ट्रवादीमधून राष्ट्रवादी फूटली. एका मतदाराला नऊ बटणं दिली. चालू ज्यांनी केले होते ते ठाणे जिल्ह्यातून येतात, असे म्हणत कुणालने आपले व्यंगात्मक गाणं सादरं केलं. 'ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी' असे बोल या गाण्याचे होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.