Maharashtra Live Update : सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 15 जागा बिनविरोध

Marathi Breaking Live Headlines Updates : सांगली जिल्हा बँकेच्या 15 जागा बिनविरोध झाल्या आहेत. मात्र, 6 जागांवर निवडणूक होणार आहे. यासह आज दिवसभरातील विविध बातम्या जाणून घेऊया.
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama

दुष्काळाच्या नावाखाली सुकाळ्यातल्या जागा बिनविरोध आणि दुष्काळ भागात मात्र निवडणूक - सदाभाऊ खोत

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत १५ संचालकांची बिनविरोध निवड झाली असून, सहा जागांसाठी १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सर्वपक्षीय पॅनेलमधील १९ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र, या निवडणुकीतील बिनविरोध निवडीवरून राजकीय वातावरण तापले आहे. भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी बिनविरोध निवडीवर आक्षेप घेत निशाणा साधला आहे. सुकाळ्यातील जागा बिनविरोध केल्या आणि दुष्काळी भागातील जागांसाठी निवडणूक लावली, असा टोला त्यांनी लगावला.

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण : ठाणे एसआयटीने मुख्य आरोपी संतोष कनोजियाकडून शस्त्रे केली जप्त

ठाणे एसआयटी पथकाने मुख्य आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली याच्याकडून कर्नाळा परिसराजवळील एका अज्ञात ठिकाणावरून हत्येत वापरलेले एक पिस्तूल आणि दोन धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. सध्या घटनास्थळी पोलिसांकडून जप्तीचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 21 पैकी 15 जागा बिनविरोध

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 21 पैकी 15 जागा बिनविरोध होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र जत, कवठेमहांकाळ, तासगाव आणि मिरज सोसायटी गटांत मात्र निवडणुकीचा सामना रंगणार आहे. जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपला चार, राष्ट्रवादी काँग्रेसला सात, काँग्रेसला सहा, अजित पवार गटाला एक आणि शिवसेना शिंदे गटाला तीन जागा देण्याचे सूत्र ठरले. या तडजोडीतून 15 जागांवरील निवडणुकीचा पेच सुटला असून, जत, मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, अनुसूचीत जाती आणि भटक्या जाती जमाती या गटांत थेट लढती होणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com