Maharashtra Live Politics Update : विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान

Marathi Breaking Live Headlines Updates : सांगली जिल्हा बँकेच्या 6 जागांवर निवडणूक होणार, विधान परिषद शिक्षक, पदवीधरसाठी आज मतदान, अमित शाहांचे विरोधकांना चॅलेंज, 30 वर्ष भाजपची सत्ता राहणार, यासह देश आणि राज्यभरातील विविध महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama

आमदार पुत्र पराभूत, अंतर्गत वादाचा फटका

मुंबई महापालिकेच्या प्रभाग समिती सदस्य निवडीवरून शिंदेची शिवसासेना-भाजपमध्ये अंतर्गत वाद आमदार पुत्राला भोवला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांचे पुत्र प्रणव लांडे यांचा पराभव झाला आहे. प्रभाग समिती सदस्य निवडणुकीत त्यांना पराभवाचा झटका बसला.

राजस्थान मधील सायबर घोटाळ्याचे उल्हासनगर कनेक्शन उघड!

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली निवृत्त सरकारी अधिकाऱ्याला तब्बल २ कोटी १२ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या सायबर टोळीचे उल्हासनगर कनेक्शन उघड झाले आहे. राजस्थान पोलिसांनी उल्हासनगरमधील जिम ट्रेनरच्या मुसक्या आवळल्याने खळबळ उडाली आहे. राजस्थान सायबर पोलिसांनी उल्हासनगरमधील जिम ट्रेनर रविंद्र जितेंद्र प्रसाद सिंह ऊर्फ अक्षय सिंह तथा देवा याला अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत विविध ठिकाणावरून सात आरोपी जेरबंद झाले आहेत.

विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदार संघांसाठी आज सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. महायुतीमधील बंडखोरी आणि महाविकास आघाडीतील बिघाडी झाल्याने काही ठिकाणी मित्रपक्षांचे उमेदवार समोरासमोर आहेत. त्यामुळे या निवडणुकीत रंगत आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com