Abu Azmi News : अबू आझमीही म्हणाले, ...तर औरंगजेबाची कबर उखडून टाका!

Aurangzeb Tomb Nagpur Violence : नागपूरमधील दंगलीनंतर अबू आझमी यांनी कबरीबाबत पहिल्यांदाच मोठं विधान केलं आहे.
Abu Azmi
Abu AzmiSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या देशभरात वातावरण तापले आहे. त्यातच नागपूरमध्ये दंगल घडल्यानंतर हा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची भाषा काही राजकीय नेते व संघटनांकडून केला जात आहे. त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नागपूरमधील दंगलीनंतर अबू आझमी यांनी कबरीबाबत पहिल्यांदाच मोठं विधान केलं आहे. महाड येथे मीडियाशी बोलताना ते म्हणाले, आजपर्यंत कबरीविषयी काही बोलले गेले नाही. आज हे का बोलले जात आहे? कबर उखडायची असेल तर उखडा, तुमचे सरकार आहे. उखडून टाका.

Abu Azmi
Mahayuti Government: महायुती सरकारचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, रखडलेलं अनुदान वाटप सुरू

कबर उघडून जर शांतता निर्माण होणार, देशाचा विकास होणार असेल तर माझी काहीच हरकत नाही. पण हे केवळ हिंसा भडकवण्यासाठी आणि हिंदू-मुस्लिम करण्यासाठी होत आहे, असे आझमी यांनी म्हटले आहे. आझमी यांनी या वादावर पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता त्यावर काय राजकीय पडसाद उमटणार हेही पाहावे लागेल.

दरम्यान, काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा प्रासंगिक नसल्याचे म्हटले आहे. एकप्रकारे हिंदुत्ववादी संघटना आणि काही नेत्यांच्या कान उपटण्यासारखे असल्याचे सांगत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आरएसएसचे आभार मानले जात आहेत. पण त्याचवेळी नेते त्यांचे ऐकणार का, असा टोलाही नेत्यांकडून लगावला जात आहे.

Abu Azmi
Disha Salian death case : इकडे दिशा सालियान प्रकरणामुळे ठाकरे अडचणीत..? तिकडे करुणा शर्मांनी मंत्री संजय राठोडांचं 'ते' प्रकरण बाहेर काढलं

आज उद्धव ठाकरे यांनीही यासंदर्भात भाजप नेत्यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पण अजूनही हा वाद संपण्याचे नाव घेत नाही. काही संघटनांकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे आज अबू आझमी यांनी दिलेली प्रतिक्रिया त्याच संतापातून आली असल्याची चर्चा आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com