Mahayuti Government: महायुती सरकारचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, रखडलेलं अनुदान वाटप सुरू

Maharashtra Dudh Utpadak Shetkari : राज्य सरकारने शेतकऱ्यांना जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांसाठी पाच रुपये आणि ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांसाठी सात रुपये प्रतिलिटर दराने अनुदान शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केली होती.
Milk
Milk sarkarnama
Published on
Updated on

नवनाथ भेके

Pune News : राज्य सरकारकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. सरकारकडून 339 कोटी दुग्धविकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.तर अनुदानासाठी 759 कोटी रुपयांना ही मंजुरी देण्यात आली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांचं (Milk Producing Farmers) पाच रुपये थकीत दूध अनुदान सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यात सप्टेंबरपर्यंतच 153 कोटींचं थकीत दूध अनुदान शेतकऱ्यांना मिळणार असल्याचंही माहिती समोर येत आहे.

महायुती सरकारकडून (Mahayuti Government) दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. सरकारकडून नुकत्याच प्राप्त झालेल्या दुधाच्या अनुदान वाटपास सुरुवात झाली असून प्राप्त झालेल्या 339 कोटी 15 लाखांपैकी 60 कोटी रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती दुग्धव्यवसाय विकास आयुक्त प्रशांत मोहोड यांनी दिली.

राज्यभरातील 11 लाख 906 शेतकर्‍यांना 5 रुपये अनुदान योजनेचे 538 कोटींचं अनुदान वाटप झाले आहे.तर तर सात रुपये दूध अनुदान योजनेच्या 623 कोटींच्या फाइल्सची पडताळणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. दुग्धव्यवसाय विकास आयुक्त प्रशांत मोहोड यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

Milk
Nagpur Riots Update : शांततेसाठी मोठे पाऊल, काँग्रेसची समिती करणार नागपूरच्या दंगलग्रस्त भागाची पाहणी!

राज्य सरकारने 29 सप्टेंबर 2024 च्या शासन निर्णयान्वये सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूधपुरवठा करणार्‍या शेतकर्‍यांसाठी दूध अनुदान योजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 1 ऑक्टोबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2024 या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रतिलिटरला सात रुपये अनुदान योजना जाहीर करण्यात आली होती.या योजनेची अंमलबजावणी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि सहकार विभागामार्फत संयुक्तरीत्या होत आहे.

दुधाचे अनुदान देण्याकरिता हिवाळी अधिवेशनात 759 कोटींची तरतूद करण्यात आली होती त्यापैकी 339 कोटी 15 लाख रुपयांचे अनुदान दुग्ध विभागास प्राप्त झाले आहे,त्यानुसार सुरुवातीच्या योजनेतील प्रतिलिटरला पाच रुपये घोषित अनुदान योजनेतील अनुदाना अभावी शिल्लक प्रस्ताव आणि सात रुपये प्रतिलिटर अनुदान योजनेंतर्गतचे प्रस्ताव मिळून हे अनुदान वितरणाची कार्यवाही सुरू करण्यात आली असून राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 60 कोटी रुपये जमा करण्यात आले आहे.

Milk
Political Family Shooting : केंद्रीय मंत्र्याच्या भाच्यांकडून एकमेकांवर गोळीबार; एकाचा मृत्यू, आईलाही लागली गोळी...

पुणे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचे जुलै ते सप्टेंबरचे रखडलेले अनुदान 11 कोटी आणि ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यांचे 7 लाख 29 हजार शेतकऱ्याचे 24 कोटी 89 लाख लिटर दुधाचे 174 कोटी असे एकूण 185 कोटी रुपये दूध अनुदान शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहेत यातील अनुदान वाटपाला सुरुवात झाली असून अनुदान लवकरच सर्व अनुदान मिळणार असल्याचे दुग्ध विकास विभागाकडून सांगण्यात आले.

अधिवेशनात सरकारकडून दूध अनुदानासाठी राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी 759 कोटींची तरतूद केल्यापैकी दुग्ध विकास विभागास प्राप्त झालेल्या 339 कोटी 15 लाख रुपयांच्या वाटपास प्रारंभ झाला आहे. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाटप सुरु झाले असून 60 कोटी वर्ग करण्यात आले आहे.

Milk
Ambadas Danve-Girish Mahajan News : सत्तेचा माज तुमच्या आकासमोर दाखवा! मंत्री गिरीश महाजन यांना अंबादास दानवेंनी सुनावले

राज्य सरकारने शेतकऱ्यांना जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यासाठी पाच रुपये आणि ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यासाठी सात रुपये प्रतिलिटर दराने अनुदान शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केली होती. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांतील काही रक्कम अनुदानाची शेतकऱ्यांना मिळणे बाकी होती. आणि ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना दुध अनुदान जवळपास तीन महिन्या.पासून अधिक दिवसापासून रखडले होते.

याबाबत राज्य सरकारने शेतकऱ्यांना अनुदानासाठी हिवाळी अधिवेशनात 759 कोटीची तरतूद केलेल्यांपैकी 339 कोटी 15 लाख रुपये दुग्धविकास विभागाला वर्ग करण्यात असून यातील अनुदान वाटपास प्रारंभ झाला असून यातील 60 कोटी वर्ग करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com