ACB Arrests PI : पगार एक लाख तरी लाच घेण्याची हाव, पीआयला पोलिस ठाण्यातच रंगेहाथ पकडले!

Bribe Case Police Manojkumar Rathod Ravi Jadhav : पोलिस ठाण्यातच पीआय आणि अंमलदाराला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. एससीबीने ही कारवाई केली.
ACB officials arrest Police Inspector Manojkumar Rathod and constable Ravi Jadhav in a bribery trap operation.
ACB officials arrest Police Inspector Manojkumar Rathod and constable Ravi Jadhav in a bribery trap operation.Sarkarnama
Published on
Updated on

Bribe Case : वाळू व्यवसायिकावर मासिक 50 हजाराचा हफ्ता देण्यासाठी ताब्यात टाकणाऱ्या पोलिस निरीक्षकासह पोलिस अंमलदाराला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. पोलिस निरीक्षक मनोजकुमार राठोड, अंमलदार रवी जाधव अशी रंगेहात पकडण्यात आलेल्यांची नावे आहे. एसीबीच्या पथकाने ही कारवाई जालना जिल्ह्यातील मंठा पोलिस ठाण्यात केली.

न्यायालायाने आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पीआय मनोज कुमार राठोड याला एक लाख 10 हजार पगार आहे. तर, अंमलदार रवी जाधव याला 60 हजार पगार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाळू व्यावसायिकाला दरमहा 50 हजाराच्या लाचेची मागणी पीआय राठोड यांच्याकडून करण्यात आली होती. त्याने 10 हजार रुपये दिले होते. त्यानंतर त्याने या संदर्भात एसीबीकडे तक्रार केली होती.

त्यानंतर एसीबीने सापळा रचून तक्रारदार पोलिस ठाण्यात 40 हजार देत असताना पीआय राठोड आणि अंमलदार जाधव यांना रंगेहाथ पकडले.

मोबाईल जप्त

कारवाईनंतर पीआय राठोड आणि अंमलदार जाधव यांचा मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या मोबाईल फोनच्या माध्यमातून या दोघांनी आणखी किती जणांकडून लाच घेतली अथवा लाचेची मागणी केली याची माहित समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com