ACB's crackdown: एसीबीचा तीन जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना दणका; बेहिशेबी माया जमवल्याचा ठपका

Education Officers: साडेनऊ कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याबद्दल सोलापूर, सांगली आणि पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
ACB logo
ACB logoSarkarnama
Published on
Updated on

ACB's crackdown: ट्रॅपच्या कारवाईचा (लाच घेताना पकडणे) पुणे एसीबीचा वेग गेल्या काही दिवसांत काहीसा मंदावल्य़ाचे दिसून आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचे (पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर) कार्यक्षेत्र असलेल्या या युनीटची शेवटची कारवाई गेल्या महिन्यात २१ तारखेला ती ही अगोदरचा ट्रॅप केल्यानंतर १५ दिवसांनी क्लास थ्री कर्मचाऱ्याविरुद्ध झाली होती. त्यानंतर १५ दिवसांनी त्यांची कारवाई झाली. पण, ती ट्रॅपची नाही. तर, साडेनऊ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याबद्दल सोलापूर, सांगली आणि पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्धची आहे.

ACB logo
Nagpur News : फडणवीसांकडे 'पालकत्व' असलेल्या नागपूरला वडेट्टीवार म्हणाले 'चोर नगरी'? कारण काय?

तीन आरोपीतील पुण्याचे तुकाराम नामदेव सुपे (पिंपळे गुरव, पिंपरी-चिंचवड) आणि सांगलीचे विष्णू मारुतीराव कांबळे (रा. शिवाजीनगर, बार्शी, जि. सोलापूर) हे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी रिटाय़र झाले आहेत. तर, सोलापूरचे किरण आनंद लोहार ( रा. आकांक्षा शिक्षक कॉलनी, पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) हे अद्याप सेवेत आहेत. या गुन्ह्यात आरोपींना साथ देणारी त्यांची पत्नी, मुलगा यांनाही आरोपी करण्यात आले आहे.

सुपे हा गाजलेल्या टीईटी परीक्षा (TET Exam) घोटाळ्यातही आरोपी आहे. त्याच्याविरुद्ध पिंपरी-चिंचवडमधील सांगवी पोलिस ठाण्यात साडेतीन कोटी रुपयांच्या अपसंपदेचा हा गुन्हा दाखल करण्यात आला. अगोदरच्या टीईटीच्या पुणे सायबर पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात त्याच्याकडे भ्रष्ट मार्गाने कमावलेली पावणेतीन कोटींची रोकड, 145 तोळे सोने असा हा साडेतीन कोटींचा ऐवज मिळून आला होता. याप्रकरणाची एसीबीचे पीआय श्रीराम शिंदे यांनी चौकशी केली, तर डीवायएसपी माधुरी भोसले या पुढील तपास करीत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

८३ लाखाची बेहिशोबी मालमत्ता भ्रष्ट मार्गाने जमा केल्याबद्दलचा दुसरा गुन्हा हा दुसरे जिल्हा शिक्षणाधिकारी कांबळेविरुद्ध सांगलीतील विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला. त्यात त्याची पत्नी जयश्री हिला आरोपी करण्यात आले आहे.

तिसरा भ्रष्ट शिक्षणाधिकारी लोहार याच्यासह त्यांची पत्नी सुजाता, मुलगा निखील यांच्याविरुद्ध सोलापूरातील सदर बझार पोलिस ठाण्यात तब्बल पाच कोटी ८५ लाख ८५ हजार ६२३ रुपयांची बेहिशोबी मालमत्ता ही भ्रष्ट मार्गाने जमा केल्याबद्दल लाचलुचप्रत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. पुणे एसीबी (Acb Unit) युनीटचे एसपी अमोल तांबे, अॅडिशनल एसपी डॉ. शीतल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली या तिन्ही कारवाया झाल्या आहेत.

(Edited by Sachin Waghmare)

ACB logo
Jayakwadi Water Issue : नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा पाणी संघर्ष का ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com