Aditi Tatkare : आदिती तटकरेंनी 'या' गाण्यावर धरला भन्नाट ठेका, घरातील उत्साही वातावरणाचा व्हिडिओ व्हायरल!

Aditi Tatkare family celebration video : आदिती तटकरे यांचा घरातील उत्साही वातावरणातील डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
Aditi Tatkare viral video latest
Aditi Tatkare viral video latestSarkarnama
Published on
Updated on

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा एक खास व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. राजकारणातील व्यस्त दिनक्रम आणि शासकीय जबाबदाऱ्यांमुळे कायम चर्चेत असलेल्या आदिती तटकरे यांचा यावेळी मात्र वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. पारंपरिक वातावरणात त्यांनी ‘सुपली सोन्याची’ या लोकप्रिय मराठी गाण्यावर मनमुराद ठेका धरला.

आदिती तटकरे यांच्या घरातील गौरी पूजनाच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये त्या कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण साजरे करताना दिसत आहेत. ‘सुपली सोन्याची’ गाण्याचा ताल सुरू होताच आदिती तटकरे यांनी उत्स्फूर्तपणे नृत्य केले. त्यांचा हा साधा आणि उत्साही अंदाज सोशल मीडिया युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे.

Aditi Tatkare viral video latest
Maharashtra ACB : लाचखोरांविरोधात 'अँटी करप्शन'चा धडाका, तब्बल 3 कोटींहून अधिक रकमेच्या प्रकरणांत पर्दाफाश

विशेष म्हणजे, राजकीय कार्यक्रमांमध्ये गंभीर भूमिकेत दिसणाऱ्या आदिती तटकरे यांचा हा घरगुती आणि आनंदी अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला. पारंपरिक गौरी पूजन, कुटुंबीयांची उपस्थिती आणि मराठी गाण्याचा ताल यामुळे या व्हिडिओला खास सणासुदीचा रंग मिळाला आहे.

आदिती तटकरे यांचा हा डान्स व्हिडिओ Instagram Reelच्या माध्यमातून समोर आला असून सोशल मीडियावर त्याची चर्चा होत आहे. व्हिडिओमध्ये ‘सुपली सोन्याची’ या गाण्यावर त्या ताल धरताना दिसत असल्याने नेटकऱ्यांचे लक्ष या Reelकडे वेधले गेले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com