NCP Merger News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण हा राजकीय चर्चेचा विषय आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये यावरून सातत्याने परस्पर विरोधी वक्तव्य होत आहेत. त्यात आता नवी भर पडली आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार समर्थक नेत्यांसह दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा विषय तुर्त बाजूला ठेवला आहे. यासंदर्भात सध्या तरी कोणतिही चर्चा नाही, असे वक्तव्य नुकतेच करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी नवी भर टाकली आहे.
जळगाव येथे माध्यमांची बोलताना मंत्री तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबत विधान केले. त्या म्हणाल्या, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अथवा पक्षनेते पार्थ पवार यांनी विलीनीकरणाबाबत नकारात्मक भूमिका घेतलेली नाही. या संदर्भात तथ्यहीन आरोप होत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारांचे केंद्रातील सत्ताधारी एनडीए सरकारला समर्थन मिळणार अशा बातम्या होत्या. त्यामुळे दोन्ही पक्षांचे विलीनीकरण होणार की, शरद पवार यांच्या खासदारांमध्ये फूट पटणार हा राजकीय विषय चर्चेत होता. या पार्श्वभूमीवर मंत्री तटकरे यांच्या विधानाने नवा राजकीय वाद निर्माण होऊ शकतो.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्यांकडून विलीनीकरण हा विषय चर्चेत नाही असे वारंवार बोलले जाते. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. या स्थितीत दोन्ही पक्षांचे विलीणीकरण हा महाराष्ट्रातील राजकीय वादाचा विषय बनला आहे.
दरम्यान अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार उत्तम काम करीत आहे. लाडकी बहीण योजना हे सरकार कधीही बंद करणार नाही. विरोधी पक्षांकडून जाणीवपूर्वक या योजनेबाबत गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे, अशी टीका त्यांनी केली.
मंत्री तटकरे अमरावतीच्या दौऱ्यावर निघाल्या होत्या. यावेळी त्यांनी जळगाव येथे माध्यमांशी संवाद केला. यावेळी पक्षाचे आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार राजू मामा भोळे, रावेत लोकसभा जिल्हाध्यक्ष अध्यक्ष योगेश नेमाडे, युवती शाखेच्या अध्यक्षा अभिलाषा रोकडे यांचं विविध नेते उपस्थित होते.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.