
Mumbai News : राज्यासमोर विविध प्रश्न असतानाही हे महायुतीचे सरकार फक्त गाजर दाखवत आहे. या सरकारला जनतेशी काही देण-घेणं नसून जनतेच्या प्रश्नांबाबत संवेदनशील नसल्याची टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ते काल झालेल्या विजयी सभेनंतर होणाऱ्या टीकेवर प्रतिक्रिया देताना बोलत होते. (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party leader Aditya Thackeray criticizes Mahayuti government for insensitivity towards public issues)
यावेळी आदित्य ठाकरे यांनी, सत्ताधाऱ्यांना चांगलेच फटकारतं आता मराठी माणूस एक झाला आहे. यामुळे भाजप असो किंवा गद्दारांची शिवसेना या महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या पोटात तर दुखणारच असाही टोला लगावला आहे. तसेच गेल्या आठवड्यात पावसाळी अधिवेशनात शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफी वरून सरकारला जाब विचारला होता.
राज्यात गेल्या एका आठवड्यात झालेल्या 750 आत्महत्यावरून आवाज उठवल्यावर थेट विरोधी पक्षाच्या आमदारालाच एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले. दुसऱ्या दिवशीही हाच प्रश्न आम्ही उपस्थित केला. मात्र, सरकार यावर उत्तर द्यायला तयार नाही. हे राज्याचे सरकार नसून हे निवडणूक आयोगाचे सरकार असल्याचा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी यावेळी जय गुजरात या घोषणेसह भाजप आमदार तथा मंत्री अशिष शेलार यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी राज्यात पुन्हा एकदा मराठी माणसाची ताकद दिसत असल्यानेच महाराष्ट्रद्वेष्ट्या भाजपच्या पोटात दुखत आहे. ज्यांची महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवण्याची इच्छा आहे त्यांच्या पोटात दुखत आहे. पण आता मराठी माणूस झुकवणार नाही. त्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे.
यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर देखील आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जे अपमान्स्पद वक्तव्य केले आहे, त्यावर शिंदे कारवाई करणार का? की फक्त सत्तेसाठी हे खपवून घेणार असाही सवाल उपस्थित केला आहे.
त्याचबरोबर प्रतार सरनाईक यांना शिंदेंना लिहलेल्या पत्रावर देखील त्यांनी सवाल उपस्थित केला आहे. तर सरनाईक यांना शिंदेंना पत्र लिहिण्याची गरज काय? ते फक्त सत्तेसाठी एकमेंकाजवळ असल्याचेच यावरून स्पष्ट होत असल्याचाही टोला लगावला आहे.
तसेच शेलार यांनी मराठी माणसांची तुलना थेट पहलगाम हल्ल्यात ज्या दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांचे प्राण घेतले. ज्यांना या मोदी सरकारला पकडताही आले नाही, त्यांच्याशी केली. त्यावरून आता भाजपचे महाराष्ट्र आणि मराठी माणसाबाद्दलचा द्वेष दिसून असल्याचीही टीका आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.