Aditya Thackeray : 'जे कारणे शोधत असतील, त्यांनी खुशाल जावे', आदित्य ठाकरेंनी निष्ठावंतांना ठणकावले

Shivsena UBT Politics : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर कोल्हापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात कोल्हापूर उत्तर, दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघातील जिल्हाध्यक्ष पदावरून चांगलाच अंतर्गत संघर्ष पाहायला मिळाला.
sanjay pawar | uddhav thackeray | ravikiran ingavale
sanjay pawar | uddhav thackeray | ravikiran ingavalesarkarnama
Published on
Updated on

Mumbai/Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा प्रमुखांच्या निवडीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात चांगलेच कलहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हाप्रमुख पदावर रविकिरण इंगवले यांची निवड केल्यानंतर शिवसेनेतील निष्ठावंत शिवसैनिकांसह प्रमुख पदाधिकारी नाराज झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वरिष्ठांकडे दाद मागितल्यानंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी याच निष्ठावंतांना ठणकावल्याने आणखीन वाद चिघणळ्याची शक्यता आहे.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावरून निष्ठावंत शिवसैनिकामध्ये चांगलाच संताप वाढवलेला आहे. पक्षात वाद नसतो, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे सांगतात तो आदेश असतो आणि तेच बरोबर असतं. ज्यांना आमच्यासोबत काम करायचं आहे. ते सोबत काम करतील ज्यांना करायचं नाही कारणे शोधत असतील तर त्यांनी जावे, अशा शब्दातच कोल्हापुरातील जिल्हाप्रमुख पदावरून झालेल्या वादावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर कोल्हापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कोल्हापूर उत्तर, दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघातील जिल्हाध्यक्ष पदावरून चांगलाच अंतर्गत संघर्ष पाहायला मिळाला. या लढाईत शहराध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी जिल्हाध्यक्ष पद मिळवले. त्यांच्या नावाची घोषणा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून करण्यात आली. तर कोल्हापूर दक्षिण शहर आणि उत्तर विधानसभा प्रमुखांच्या देखील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून नावे जाहीर करण्यात आली. ज्यात कोल्हापूर दक्षिण शहर प्रमुखपदी हर्षल सुर्वे, उत्तर विधानसभा प्रमुखपदी विशाल देवकुळे यांची निवड करण्यात आली आहे.

sanjay pawar | uddhav thackeray | ravikiran ingavale
Aditya thackeray: मोर्चाआधीच आदित्य ठाकरेंनी वात पेटवली; हिंदी भाषेचा जीआर नेमका कुणाचा?

मात्र इंगवले यांच्या नावाला पक्षातीलच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवत नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. विश्वासात न घेतल्याने पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांसह दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते देखील नाराज आहेत. शेजारीच बसून दुसऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांसोबत आम्ही पक्षात काम कसे करायचे, असा सूर निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये आज उमटला आहे. शहरासह ग्रामीण भागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी देखील आपापला आलेला अनुभव बैठकीत व्यक्त केला.

sanjay pawar | uddhav thackeray | ravikiran ingavale
Sanjay Shirsat On Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा इव्हिनिंग वाॅक; संजय शिरसाट यांच्याकडून हल्लोबोल मोर्चाची खिल्ली!

दरम्यान शिवसेनेचे उपनेते संजय पवार, विजय देवणे विरुद्ध शहराध्यक्ष रविकिरण इंगवले असा सातत्याने अंतर्गत संघर्ष दिसून येत होता. पदावरून सुरू झालेल्या संघर्षामुळे आंदोलनाच्या वेळी संजय पवार, विजय देवणे असतील तेथे रविकिरण इंगवले उपस्थित नसतं. तर ज्या ठिकाणी रविकिरण इंगवले यांचे आंदोलन असे त्या ठिकाणी संजय पवार किंवा विजय देवणे दांडी मारत. यामुळे राज्यस्तरावर हा विषय गेल्याने ठाकरेंच्या शिवसेनेची बदनामी होत होती. पण आता हा विषयच निकाली निघाला असून शहराध्यक्ष रविकिरण इंगवले यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर यावरून नाराजांना देखील आदित्य ठाकरे यांनीच ठणकावले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com