मनसुख हिरेन नंतर आता माझ्या हत्येचा ठाकरे सरकारचा प्लॅन

पुण्यात माझ्यावर लाठ्या, काठ्या, दगड घेऊन हल्ला करण्यात आला, तेव्हा पुणे पोलिस शांत बसले होते. जे फुटेज समोर आले आहे, यातून ते स्पष्ट होते. (Kirit Somaiya,Bjp)
Kirit Somaiya, Bjp Leader
Kirit Somaiya, Bjp LeaderSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : उद्धव ठाकरे, संजय राऊत, अनिल परब, पाटणकर यांचे घोटाळे बाहेर काढत असल्यामुळे किरीट सोमय्याला गप्प बसवायचे प्रयत्न केले जात आहेत. (Kirit Somaiya) मनसुख हिरेनची जशी हत्या झाली, तशीच माझी देखील करण्याचा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारचा प्लॅन असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे.(Bjp) पण ठाकरे सरकारचे सगळे घोटाळे बाहेर काढल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देखील सोमय्या यांनी दिला आहे.

पुणे महापालिकेतील भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्यासाठी गेलेल्या किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला. या हल्यात ते खाली पडले आणि त्यांच्या माकडहाडाला जबर मार बसला. त्यांना रुग्णालयात भरती व्हावे लागले होते. यावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली होती.

देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी हा भ्याड हल्ला असून आम्ही शांत बसणार नाही, म्हणत रान पेटवले. सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप केला होता. आज पुन्हा एक व्हिडिओ जारी करत सोमय्या यांनी मनसुख हिरेन हत्येनंतर आता आपली हत्या करण्याचा ठाकरे सरकारचा प्लॅन असल्याचा दावा केला आहे.

Kirit Somaiya, Bjp Leader
पंजाबमध्ये भाजपचा हुकुमाचा एक्का! राम रहीमचा तब्बल 69 जागांवर पडणार प्रभाव

पुण्यात माझ्यावर लाठ्या, काठ्या, दगड घेऊन हल्ला करण्यात आला, तेव्हा पुणे पोलिस शांत बसले होते. जे फुटेज समोर आले आहे, यातून ते स्पष्ट होते. केवळ केंद्र सरकारच्या झेड सेक्युरिटीमुळे मी वाचलो. संजय राऊत, उद्धव ठाकरे, अनिल परब, पाटणकर यांचे घोटाळे बाहेर येत आहेत, म्हणून किरीट सोमय्या यांना गप्प बसवायचे आहे.

पण मी गप्प बसणार नाही, मी राज्यपालांना भेटणार आहे, त्यानंतर गुरुवारी केंद्रीय गृहमंत्रालयाला रिपोर्ट देणार आणि ठाकरे सरकारचे घोटाळे काढूनच गप्प बसणार, असा इशारा देखील सोमय्या यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com