पंजाबमध्ये भाजपचा हुकुमाचा एक्का! राम रहीमचा तब्बल 69 जागांवर पडणार प्रभाव

राम रहीमचे पंजाबमधील 23 जिल्ह्यांत 300 मोठे डेरे असून, तब्बल 69 जागांवर त्याचा प्रभाव पडू शकतो.
Gurmeet Ram Rahim and Manohar Lal Khattar
Gurmeet Ram Rahim and Manohar Lal Khattar Sarkarnama
Published on
Updated on

चंडीगड : पंजाबमधील विधानसभा निवडणुकीच्या (Punjab Election 2022) केवळ 14 दिवस आधी डेरा सच्चा सौदाचा (Dera Sacha Sauda) प्रमुख गुरमीत राम रहीम (Gurmeet Ram Rahim) या तुरुंगातून बाहेर काढण्याची खेळी भाजपने (BJP) खेळली आहे. राम रहीमचे पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत. राम रहीमचे पंजाबमधील 23 जिल्ह्यांत 300 मोठे डेरे असून, तब्बल 69 जागांवर त्याचा प्रभाव पडू शकतो.

राम रहीमचे पंजाबमध्ये माझा, माळवा आणि दोआबा या विभागात डेरे आहेत. तेथे त्याला मानणारा वर्ग अधिक आहे. याचबरोबर हरियानातील सिरसा जिल्ह्यात त्याचा प्रमुख डेरा आहे. माळवा विभागात राम रहीमची ताकद अधिक असून, तेथील तब्बल 69 जागांवर त्याचा प्रभाव पडू शकतो. पंजाबमधील 2007, 2012, 2017 मधील विधानसभा निवडणुकीत डेराने महत्वाची भूमिका बजावली होती. माजी मुख्यमंत्री अमरिदरसिंह हे सपत्नीक डेऱ्यात गेले होते. याचबरोबर बादल परिवारानेही डेऱ्यात हजेरी लावली होती. याचसोबत डेराने 2014 ची लोकसभा आणि हरियानातील विधानसभा निवडणुकीत मोदींना पाठिंबा दिला होता.

Gurmeet Ram Rahim and Manohar Lal Khattar
निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं टाकला डाव अन् बाबा राम रहीम तुरुंगातून बाहेर

राम रहीमच्या सुटका होणार असल्याची बातमी मिळताच आतापासूनच त्याच्या भक्तांनी जल्लोष सुरू केला आहे. पंजाबसोबत उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उत्तर प्रदेशातही राम रहीमचे अनुयायी आहेत. त्याला 21 दिवसांची फर्लो रजा मंजूर करण्यात आली आहे. याचा परिणाम विधानसभा निवडणुकांवर होणार आहे. भाजपने राम रहीमला तुरुंगातून बाहेर काढून मोठी खेळी खेळल्याचे मानले जात आहे. मागील दशकभरापासून राम रहीम हा तुरुंगात आहे. त्याच्या सुटकेच्या आदेशावर स्वाक्षरी झाल्यानंतर त्याला आजच तुरुंगातून सोडण्यात येणार आहे.

Gurmeet Ram Rahim and Manohar Lal Khattar
दादागिरी खपवून घेणार नाही! सोमय्या प्रकरणावरून रक्षा खडसेंचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

साध्वींवरील बलात्कार आणि पत्रकाराच्या हत्येप्रकरणी राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा न्यायालयाने ऑगस्ट 2017 मध्ये सुनावली होती. नंतर 2021 मध्ये त्याला 19 वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. डेरा व्यवस्थापक रणजितसिंग यांच्या खून प्रकरणात राम रहीम आणि चौघांना केंद्रीय विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते. राम रहीम 13 लाख रुपये तर इतर चौघांना 50 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. रणजितसिंग याचा 2002 मध्ये खून करण्यात आला होता. या प्रकरणात राम रहीमसह डेरा व्यवस्थापक क्रिशन लाल, शूटर जसबीरसिंग आणि सबदिलसिंग यांनाही दोषी ठरवण्यात आले होते. यातील आरोपी इंदर सैन याचा ऑक्टोबर 2020 मध्ये मृत्यू झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com