Amol Mitkari : अजितदादांच्या अपघातापूर्वी केलेल्या अघोरी पूजेचे पुरावे 4 महिन्यांनी आले समोर, काटेवाडीतील बंगल्यासमोर बोकड उलटं टांगलेले फोटो मिटकरींनी केले शेअर

Ajit Pawar Accident Mystery : 'बारामतीमध्ये सहयोग घर, काटेवाडी घर, विद्या प्रतिष्ठान येथे अघोरी पूजा होतात. हे बाहेरून येऊन करणार्‍यांना शक्य नाही. तर अघोरी विद्या मानणारे त्यांच्याशी जोडले जाणारे राजकीय बलाढ्य व्यक्ती व त्यांचे बारामतीला असलेले हस्तक या शिवाय हे होऊ शकत नाही.'
Ajit Pawar Accident Mystery | Amol Mitkari Claims
Photos allegedly showing Aghori rituals near Baramati sites linked to Ajit Pawar’s visit, fueling the accident controversy.Sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar accident : भोंदू अशोक खरातचे अनेक राजकीय नेत्यांसोबत फोटो समोर आले होते. तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही खरातशी जवळीक असल्याने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर खरात आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताचं कनेक्शन तर नाही ना? अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी व्यक्त केली होती.

यासाठी त्यांनी नोव्हेंबर महिन्यात अजित पवारांच्या घराजवळ आणि कार्यालयाजवळ अघोरी पूजा झाल्याचा गंभीर दावा केला होता. या संबंधित त्यांनी अनेक फोटो एक्सवरून शेअर केले होते. अशातच आता अमोल मिटकरींनी आणखी एक खळबळजनक दावा केला आहे.

मिटकरी यांनी एक्सवर काही फोटो शेअर करत पुन्हा एकदा अजित पवारांचा दौरा होता त्या ठिकाणी आधीच अघोरी पूजा केली होती, असा दावा केला आहे. त्यांनी या प्रकरणी तीन ट्विट केली आहेत.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, 'बारामतीमध्ये सहयोग घर, काटेवाडी घर, विद्या प्रतिष्ठान येथे अघोरी पूजा होतात. हे बाहेरून येऊन करणार्‍यांना शक्य नाही. तर अघोरी विद्या मानणारे त्यांच्याशी जोडले जाणारे राजकीय बलाढ्य व्यक्ती व त्यांचे बारामतीला असलेले हस्तक या शिवाय हे होऊ शकत नाही, अशातच या कालावधीत बारामतीत काही व्हिडिओ प्रसार माध्यमात फिरत आहेत.

Ajit Pawar Accident Mystery | Amol Mitkari Claims
NCP Politics : बारामतीचे मतदान उरकताच सुनेत्रा पवारांनी दोन्ही लेकांवर टाकली मोठी जबाबदारी; जय पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब?

डिसेंबर 2025 रोजी विद्या प्रतिष्ठान ए.आय इमारत बांधकामाजवळ ही अघोरी पूजा मध्य रात्री मांडली होती. आदरणीय दादा सकाळी इमारत बांधकाम पाहणी करण्यासाठी येणार होते.', असं म्हणत मिटकरी यांनी या प्रकरणामागे बड्या राजकीय नेत्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

तसंच त्यांनी 28 डिसेंबर 2025 रोजी विद्या प्रतिष्ठान ए.आय इमारत बांधकामजवळ मध्यरात्री मांडलेली ही अघोरी पूजा, असं लिहित अघोरी पूजेचे फोटो देखील शेअर केले आहेत. त्यामुळे आता अजित पवारांच्या निधनाआधी ही पूजा कशासाठी करण्यात आली आणि अजितदादांच्या अपघाताशी या पूजेचा काही संबंध आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Ajit Pawar Accident Mystery | Amol Mitkari Claims
Girish Mahajan Controversy : वाहतूक कोंडीवरून मंत्री महाजनांना भिडणाऱ्या महिलेच्या अडचणीत वाढ; अखेर पहिली तक्रार दाखल...

दरम्यान, मिटकरींनी आपल्या तिसऱ्या ट्विटमध्ये, काटेवाडी परिसरात बोकड उलटे टांगून खाली अघोरी पुजा केल्याचं परिसराती लोकांनी आपल्याला सांगितल्याचा दावा केला आहे. त्यांनी लिहिलं की, 'खताळपट्टा काटेवाडी परिसरात दादांच्या बंगल्यासमोरील हे भयंकर दृश्य, विमान अपघातापूर्वी या ठिकाणी बोकड उलटे टांगून खाली अघोरी पुजा केल्याचे परिसरातील लोकांनी सांगितले.

चार महिन्यानंतर अशा अवस्थेत हे सर्व आढळलं. अंधश्रद्धा नाकारणाऱ्या दादांचा अंधश्रद्धा मानणाऱ्या लोकांनी कसा घात केला? हे भयंकर सत्य जनतेसमोर आलेच पाहिजे,' असं म्हणत त्यांनी अजित पवारांचा घात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. तर आता मिटकरी यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांचा अपघात की घातपात? याबाबतची चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com