BJP : तगडे संख्याबळ असूनही भाजपची अत्यंत सावध पावलं; तीन आमदारांसाठी 'सिक्रेट स्ट्रॅटेजी'

BJP : महाराष्ट्र भाजपकडून दादाराव केचे,अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी या ज्येष्ठ व एकनिष्ठ नेत्यांना आमदारकीची संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

BJP Politics : महाविकास आघाडी सरकार काळात पुरेसे संख्याबळ नसताना भाजपने विधान परिषदेच्या पाचही जागा जिंकल्या होत्या. विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने हा चमत्कार घडवून आणला होता. अत्यंत सावध पावलं टाकत, भाजपने ती निवडणूक जिंकवून दाखवली होती. आताही विधान परिषदेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. आता तर भाजपकडे तगडे संख्याबळही आहे. पण त्यानंतरही भाजपने अत्यंत सावध पावलं टाकत या निवडणुकीसाठी सिक्रेट स्ट्रॅटेजी तयार केली आहे.

महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने पाचही जागा महायुतीला मिळणार आहेत. पाचपैकी तीन भाजपला, एक राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला जागा मिळणार असल्याची माहिती आहे. यात तिन्ही पक्षांकडून वरिष्ठ पातळीवर नावेही फायनल झाली असल्याची माहिती आहे. 17 मार्चला उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक अर्जावर दहा सह्या सूचक म्हणून लागतात. मात्र उमेदवार कोण असणार हे न सांगताच भाजपच्या आमदारांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत. तुम्ही कोणाच्या उमेदवारी अर्जावर सह्या करत आहेत, याची माहिती त्यांना देण्यात आली नाही. त्यामुळे तीन आमदारांसाठी भाजप किती गोपनीय पद्धतीने रणनीती आखत आहे याचा अंदाज येऊ शकतो.

Devendra Fadnavis
MLC By-Election: अजित पवारांसमोर विधानपरिषदेच्या एका जागेसाठी कोते पाटील अन् सिद्दीकी हे दोन तगडे पर्याय, कुणाच्या पारड्यात वजन टाकणार?

भाजपकडून तीन नावे फायनल :

महायुतीत विधानपरिषदेवर असलेले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, रमेश कराड हे विधानसभेवर निवडून गेले. त्यांच्याजागी भाजपने 3 नावं निश्चित केल्याची माहिती समोर येत आहे. ही तीन नावे दिल्लीत फायनल करण्यात आल्याचेही बोलले जात आहेत. महाराष्ट्र भाजपकडून दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी या ज्येष्ठ व एकनिष्ठ नेत्यांना आमदारकीची संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis
MLC Election: विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी महायुतीमध्ये जोरदार टशन; 'या' इच्छुक नेतेमंडळींनी लावली फिल्डिंग

शिवसेना - राष्ट्रवादी कोणाला देणार संधी?

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून माजी आमदार रवींद्र फाटक, शितल म्हात्रे आणि चंद्रकांत रघुवंशी यांची नाव आघाडीवर असून त्यांच्यापैकी एकाची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून माजी आमदार झिशान सिद्दकी, संग्राम कोते-पाटील आणि माजी खासदार आनंद परांजपे यांची नावे चर्चेत आहेत.या तीन जणापैकी एकाची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com