Ajit Pawar Birth Anniversary : अजितदादांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक; दोघांचे जुने फोटो शेअर करत म्हणाल्या, "सगळं सगळं पोरकं झालंय..."

Sunetra Pawar Emotional Tribute : "दादा; एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला. घर, कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा. पण आज तुमचा हाच दिवस 'जयंती' म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय."
Sunetra Pawar pays floral tribute to Ajit Pawar on his birth anniversary and shares an emotional remembrance on X.
Sunetra Pawar pays floral tribute to Ajit Pawar on his birth anniversary and shares an emotional remembrance on X. Sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar Birth Anniversary : आज दिवंगत नेते अजित पवार यांची जयंती असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अजितदादांच्या स्मृतिस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं आहे. अजितदादांना अभिवादन केल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी दादांच्या आठवणीत एक भावनिक ट्वीट केलं आहे.

या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. तुमचा वाढदिवस 'जयंती' म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय. हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन अजिबात तयार होत नाही दादा, असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सुनेत्रा पवारांनी एक्सवर अजितदादांसोबतचे काही फोटो शेअर करत लिहिलं की, "दादा; एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला. घर, कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा. पण आज तुमचा हाच दिवस 'जयंती' म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय. हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाही दादा.

Sunetra Pawar pays floral tribute to Ajit Pawar on his birth anniversary and shares an emotional remembrance on X.
Dharmendra Pradhan : राहुल गांधींनी 'ते' फोटो ट्विट करताच शिक्षणमंत्र्यांनी मौन सोडलं; थेट मुद्द्याला हात घातला, म्हणाले, "चर्चेस तयार पण काँग्रेस निर्लज्जपणे..."

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद बनून सोबत राहिलात. तुमचा तो भक्कम आधार, कठीण प्रसंगात पाठीवर पडणारी तुमची विश्वासू थाप आणि मला दिलेली साथ. आज हे सगळं अचानक हरवून गेलंय, सगळं सगळं पोरकं झालंय यावर विश्वासच बसत नाही.

Sunetra Pawar pays floral tribute to Ajit Pawar on his birth anniversary and shares an emotional remembrance on X.
Rahul Gandhi Protest: मोदींच्या घराबाहेर राहुल गांधी कसे पोहोचले? खर्गेंच्या वाढदिवसाचं निमित्त, आखली आंदोलनाची रणनीती

काळाने माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढ्या लवकर हिरावून नेईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, अशा शब्दात त्यांनी आपल्या मनातील दु:ख व्यक्त केलं आहे. तर आज तुमचा हा दिवस साजरा करताना काळीज पिळवटून निघतंय, डोळ्यांतील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत.

दादा, तुम्ही भलेही आज माझ्यासोबत शारीरिकदृष्ट्या नसलात, तरी तुमचे विचार, तुमच्या आठवणी , तुमचा लोकांप्रती सेवाभाव, शिस्त आणि तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात, कणाकणात कायम जिवंत राहील. माझ्या आयुष्याच्या साथीदाराला, तुमच्या पवित्र आठवणींना भावपूर्ण आणि आदरपूर्वक प्रणाम, असं म्हणत सुनेत्रा पवारांनी दादांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com