Ajit Pawar : 'सध्या नवा ट्रेंड!, नेत्यांच्या पाया पडलं जातं, पण'; अजित पवारांनी पुढाऱ्यांची लायकीच काढली

Ajit Pawar On Political Leaders : सध्या समाजात नवा ट्रेंड पाहायला मिळत असून लोक आई-वडिलांच्या पाया पडण्या ऐवजी नेते पुढाऱ्यांचे पाय पडतात. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं भाष्य केलं आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असून राज्याचे सत्तेत अजित पवार ही सहभागी झाले आहेत. तर राज्यातील महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना आता हादरे बसून लागले आहेत. दरम्यान काँग्रेस सेवादलाच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्याचे पुढारी आणि नेत्यांची लायकीच काढणारे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. अजित पवार यांनी, सध्या लोक आपल्या घरात आई-वडिलांच्या पाया पडणार नाहीत. पण कोणाच्याही पाया पडू शकतात. सध्या अशी एक पद्धतच सुरू झाली असून अनेकजण पुढाऱ्यांच्या पाय देखील पडतात. पण ते पुढारी त्या लायकीचे आहेत का? असा सवाल केला आहे. यावरून सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत दायमा यांच्यासह काँग्रेस सेवा दलाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सल्ला देताना हा इशारा दिला आहे.

यावेळी अजित पवार यांनी, आपल्या पक्षात प्रवेश करणाऱ्या लोकांना उद्देशून बोलताना, पक्षात येणाऱ्यांची प्रतिमा जनतेत चांगली पाहिजे. पण फक्त चुकीचे कामांवर पांघरू घालण्यासाठी पक्षात येत असाल तर प्रवेश मिळणार नाही, असाच सज्जड दम भरला आहे. तर पक्ष प्रवेश करून कोणाला आपल्या चुकीवर पांघरून पडेलं असं वाटतं असेल तर ते डोक्यातून काढून टाका. मी कायद्याचा आदर करणारा आहे, कायदा श्रेष्ठ असून चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं जाणार नाही, अशाही कामपिचक्या त्यांनी दिल्या आहेत.

Ajit Pawar
Ajit Pawar VS Sharad Pawar : राष्ट्रवादी कोणाची, घड्याळ कोणाला मिळणार? आज सर्वोच्च निर्णय?

यावेळी अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना, दिशाभूल करून जास्त काही मिळत नाही किंवा केलंलं कामही जास्त काळ टिकत नाही. यामुळे आपण आजही चव्हाण यांच्या विचारांवर चालत असून त्यांच्या विचारांचे आहोत.

Ajit Pawar
Ajit Pawar On Waghya Dog Statue : रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी, अजितदादा म्हणतात, 'का जुने विषय...'

यावेळी त्यांनी सध्याच्या पुढाऱ्यांसह नेत्यांचे देखील कान टोचले असून कोणाही चुकीचं वक्तव्य करू नका, एखादा अपशब्द आपल्या तोंडातून बाहेर पडेल असे काही करू नका, असा सल्ला दिला आहे. तर आपल्या एका शब्दामुळे नंतर कोणताही प्रॉब्लम व्हायला नको. आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाताना शिव, शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारांचा विसर पडायला नको असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com