
Chhatrapati Sambhaji Nagar News : नुकसाच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी त्यांच्याकडून आपल्या मंत्र्यांसाठी बजेटमध्ये हात ढिला सोडण्यात आल्याचे समोर आले आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील मंत्र्यांच्या खात्यांना निधीमध्ये कट लावण्यात आल्याने महायुतीत धुसफूस समोर आली आहे. या मुद्द्यामुळे आता शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजीनाट्य पाहायला मिळत असून अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील निधीवर शिंदे यांच्या मंत्र्याने नाराजी व्यक्त केली आहे.
राज्याचा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी शिवसेना शिंदे गटाला झुकते माप दिल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणाऱ्या नगरविकास विभागालाही कमी निधी देत कट लावला आहे. ज्यामुळे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी जाहीर पणे नाराजी व्यक्त करताना, अशा पद्धतीने कट कसा काय लावू शकता असा सवाल केला आहे. यामुळे महायुतीत पहिल्याच अर्थसंकल्पानंतर खटके उडाल्याचे समोर आले आहे.
निधीत कट मारण्यावरून शिरसाट यांनी जाहीर पणे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी आपल्याच सरकारला अशा पद्धतीने कट मारल्यास उद्रेक होईल, असा इशारा सरकारलाच दिला आहे. तसेच शिरसाट म्हणाले, लाडकी बहीण योजना चांगली असून या योजनेला पैसे दिले पाहीजेत. याबाबत कोणाचेच दुमत नाही. पण, यासाठी विकासाची कामांना कात्री लावण्यात आली आहे. यातही हरकत नाही. मात्र आता सामाजिक न्याय विभागाच्या निधीलाच कट लावण्यात आला आहे. याला मात्र आपली हरकत आहे. कटमुळे आता विभागाला निधीवर मर्यादा येतात. यामुळे असा कट लावता येत नाही, असेही शिरसाट यांनी म्हटले आहे.
कायद्यानुसार पैसे द्यावे लागतात. त्याला कट लावता येत नाही. हा नियम आहे असंही शिरसाट म्हणाले. असं असताना ही लाडकी बहीण योजनेसाठी 4 हजार करोड, पंतप्रधान आवास योजनेसाठी 1500 कोटी, वीज सवलतीसाठी 1400 कोटी हे आपल्या खात्यातून वळते करण्यात आले. त्यामुळे जवळपास सात हजार कोटींचा फटका आपल्या खात्याला बसला आहे असं शिरसाट म्हणाले. सामाजिक न्याय विभाग हा सर्व सामान्य, दलित, वंचितांसाठीचा विभाग आहे. त्याच विभागाला कट लावला तर या समाजाच्या कल्याणाचे काय होणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
"सामाजिक न्याय विभागाला निधी मिळाला नाही तर कामे होणार नाहीत. कामे झाली नाहीत तर समाजावर अन्याय केल्या सारखे होईल. त्यामुळे कायद्यानुसार जे आहे ते या विभागाला द्यावेच लागेल", असेही शिरसाट यांनी म्हटले आहे. तर "अशा पद्धतीने विभागाच्या निधीला कट लावता येणार नसून याचा विपरित परिणाम होईल. शिवाय त्याचे दुरगामी परिणाम खात्याला भोगावे लागतील", असा दावा शिरसाट यांनी केला आहे.
त्याचबरोबर शिरसाट यांनी, खात्याला निधी मिळाला नाही तर कोणत्या योजना बंद करायच्या? समाजाच्या प्रश्नांना कसे तोंड द्यायचं? असा सवाल करताना या आव्हानाला आम्हाला आता तोंड द्यायचे आहे. त्यामुळे असा कट लागला असेल असेल तर नक्कीच उद्रेक होईल. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्र्यांना भेटणार असून खात्याला पूर्ण निधी द्या अशी विनंती करणार असल्याचेही शिरसाट यांनी सांगितले आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.