Ajit Pawar Death : अजितदादांची बातमी ऐकून कट्टर कार्यकर्त्याचे निधन; भरभरून बोलले अन् काही मिनिटांतच घेतला अखेरचा श्वास

NCP Worker Death : अजित पवार यांच्या निधनाची बातमी ऐकताच निष्ठावंत राष्ट्रवादी कार्यकर्त्याला हृदयविकाराचा झटका आला. या दुर्दैवी घटनेने नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.
NCP supporters mourn after hearing Ajit Pawar death news, as shock and grief spread across Maharashtra following the sudden demise of the senior leader.
NCP supporters mourn after hearing Ajit Pawar death news, as shock and grief spread across Maharashtra following the sudden demise of the senior leader.Sarkarnama
Published on
Updated on

Nashik NCP News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दु:खद मृत्यूने बुधवारची (ता.28) सकाळ महाराष्ट्राला हादरून टाकणारी ठरली आणि संपुर्ण राज्य शोकसागरात बुडाले. अजित पवारांच्या मृत्यूची वार्ता समजताच दादांवर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी अक्षरश टोहो फोडला.

त्यातच एक दुर्दैवी घटना घडली दिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक सुदाम कारभारी बोडके (वय 63) यांचे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काल सकाळी सुदाम बोडके हे एका नातेवाईकांच्या दशक्रिया विधी कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूची बातमी त्यांच्या कानावर पडली. या धक्कादायक बातमीने ते अत्यंत गहिवरले. उपस्थितांशी त्यांनी अजित पवारांबद्दल भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करत भरभरून संवाद साधला. यानंतर अस्वस्थ मनःस्थितीत ते दुचाकीवरून नाशिककडे निघाले.

NCP supporters mourn after hearing Ajit Pawar death news, as shock and grief spread across Maharashtra following the sudden demise of the senior leader.
Ajit Pawar Death : दादांनी माझ्या ज्येष्ठत्वाचा कायम सन्मान केला..; अजित पवारांच्या निधनानंतर छगन भुजबळांनी जागवल्या आठवणी

नाशिक येथील मार्केट यार्ड परिसरात पोहोचल्यावर त्यांना अधिक त्रास जाणवू लागला. उपचारासाठी ते स्वतः एका खाजगी दवाखान्यात गेले, मात्र दवाखान्यातच त्यांची प्रकृती अधिक खालावली व ते कोसळले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. तीव्र हृदयविकाराचा झटका हे मृत्यूचे कारण असल्याचे सांगण्यात आले आहे.

NCP supporters mourn after hearing Ajit Pawar death news, as shock and grief spread across Maharashtra following the sudden demise of the senior leader.
Ajit Pawar Death : शेवटची भेट, शेवटचे हस्तांदोलन अन् शेवटचा निरोप... अजितदादांच्या आठवणींनी अशोक चव्हाण गहिवरले

सुदाम बोडके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच अजित पवार (Ajit Pawar Plane Crash Death) यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या निधनाने ढकांबे परिसरासह दिंडोरी तालुक्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com