Ajit Pawar VS Eknath Shinde: अजिदादांवर एकनाथ शिंदेंचे शिलेदार अजुनही नाराज, 'त्या' कार्यक्रमाकडे फिरवली पाठ!

Eknath Shinde Loyalists Upset With Ajit Pawar: राष्ट्रवादी आणि भाजपचे मंत्री कार्यक्रमाला हजर होते. एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित असताना मात्र त्यांच्या मंत्र्यांनी मात्र या कार्यक्रमाकडे सपशेल पाठ फिरवली.
Empty seats at Ajit Pawar's program as Eknath Shinde's ministers remain absent
Empty seats at Ajit Pawar's program as Eknath Shinde's ministers remain absentSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थखात्याकडून सहकार्य मिळत नसल्याची खंत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री अनेकदा बोलून दाखवतात. अजितदादा निधी देत नसल्याची तक्रार देखील अनेकदा या मंत्र्यांकडून करण्यात आली आहे. संजय शिरसाट, भरत गोगावले यांनी जाहीरपणे यावि

षयी भाष्य केले आहे. त्यामुळे शिंदेंचे मंत्री अजितदादांवर नाराज असल्याची चर्चा होती. ही नाराजी दूर केली जाईल, असे महायुतीमधील नेते सांगत होते. प्रत्यक्षात मात्र ही नाराजी दूर झाली नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामुळे दिसून आल्याची चर्चा आहे.

अजितदादांच्या यांचा 22 जुलैला वाढदिवस झाला. त्यानंतर वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सुनील तटकरे यांच्या वतीने नुकताच स्नेहभोजन कार्यक्रमात आयोजित केला होता. या कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. भाजपचे आणि राष्ट्रवादीचे मंत्री या कार्यक्रमाला आवर्जून हजर होते.

राष्ट्रवादी आणि भाजपचे मंत्री कार्यक्रमाला हजर होते. एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित असताना मात्र त्यांच्या मंत्र्यांनी मात्र या कार्यक्रमाकडे सपशेल पाठ फिरवली. एकही मंत्री या कार्यक्रमासाठी आला नसल्याची माहिती आहे.

बहुतेक मंत्री मुंबईतच होते मात्र त्यांनी या कार्यक्रमाला जाणे टाळल्याची चर्चा आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी मंत्री संजय शिरसाट यांनी अजितदादांची भेट घेत आपल्या खात्याच्या निधी संदर्भात चर्चा केली मात्र कार्यक्रमाला ते देखील उपस्थित नव्हते.

Empty seats at Ajit Pawar's program as Eknath Shinde's ministers remain absent
Anjali Damania On Eknath Khadse : एकनाथ खडसे तुम्हाला देवाने धडा शिकवला, अंजली दमानियांनी 'ती' खंत देखील बोलून दाखवली

'या' मंत्र्यांची उपस्थिती

अजितदादांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री पंकजा मुंडे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे, आदिती तटकरे, दिलीप वळसे पाटील आदी उपस्थित होते.

Empty seats at Ajit Pawar's program as Eknath Shinde's ministers remain absent
Teacher Abuse Case: भयंकर, हस्ताक्षर खराब म्हणत 8 वर्षाच्या विद्यार्थ्याला मेणबत्तीचे चटके; दोन्ही हात पोळले, गुन्हा दाखल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com