

Pune News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शेवटचा कॉल रेकॉर्ड सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. या कॉल रेकॉर्डमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते दिगंबर दुर्गाडे यांचा संदर्भ आपल्या कार्यकर्त्याला सांगितला असल्यास समोर आला आहे. त्यानंतर दिगंबर दुर्गाडे यांनी या कॉल रेकॉर्ड बाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दिगंबर दुर्गाडे म्हणाले, अजितदादांची ती ऑडिओ क्लिप बारामती अथवा तिकडच्या परिसरातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तिकिटासंदर्भात असल्याची पाहायला मिळत आहे. तिकीट वाटपाबाबत दादा आपल्या कार्यकर्त्याला समजावून सांगत असल्याचं पाहायला मिळत आहे.
माझं नाव घेऊन अजित दादांनी आपण जातपात मानत नाही. असं कार्यकर्त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येत आहे. अजित पवार खऱ्या अर्थाने जात-पात न म्हणणारे लोकनेते होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील अजित पवार यांचे आणि माझे वैचारिक मतभेद असतील मात्र दादा हे जात-पात न मानणारे व्यक्ती होते असे सांगितले आहे. आणि नेमका हाच विचार दादांच्या शेवटच्या कॉल रेकॉर्डिंग मधून दिसून येत आहेत.
अजितदादांनी विविध जाती धर्मातील लोकांना वेगवेगळ्या पदावर संधी दिली मला देखील जिल्हा बँकेवर त्यांनी अनेक वर्ष संधी दिली आहे. अजितदादा यांनी 1997 ला पहिले जिल्हा परिषदचे तिकीट सुद्धा मला दिलं होतं आणि आता जाताना सुद्धा माझ्या मुलीला तिकीट दिल आहे.
मात्र त्यांनी ज्यांना तिकीट दिली त्यांना निवडून आणण्यासाठी आता दादा आपल्यात नाहीत. दादाच्या माध्यमातून ही शेवटचं तिकीट वाटप सबंध महाराष्ट्रात झालं त्यामुळे त्या उमेदवारांना मतदान करणं हे त्यांना खरी श्रद्धांजली राहील असं दुर्गाडे म्हणाले. दादा आता नाहीत मात्र दादा सगळ्या जाती-धर्मांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जात होते. हे त्यांच्या शेवटच्या कॉल रेकॉर्ड मधून स्पष्ट झाला आहे. त्यामुळे हेच विचार आपल्याला पुढे घेऊन जायचं असल्याचा दुर्गाडे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.