

TET EXAM News : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सात फेब्रुवारीला होणार आहे. या परीक्षेच्या अनुषंगाने राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकात देखील 7 फेब्रुवारी (शनिवारी) होत आहे. त्यामुळे जे शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी नियु्क्ती झाली होती त्यांना ही परीक्षा देता येणार नव्हती. मात्र, सरकारने परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना आता निवडणूक कर्तव्यातून सूट दिली आहे.
सरकारच्या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला असून शिक्षकांना सीईटी परीक्षा देण्याची अडचण दूर झाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक पाच फेब्रुवारीला होणार होत्या. मात्र, उपमुख्यमंत्री अजि पवार यांच्या अपघाती निधनानंतर सात फेब्रुवारीला निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
7 फेब्रुवारीला मतदान होणार असल्याने जे शिक्षकांची निवडणूकीच्या कर्तव्यावर नियुक्ती झाली होती त्यांची अडचण झाली होती. कारण त्याच दिवशी सीईटी परीक्षा देखील होती. सरकारने शिक्षकांसाठी ही परीक्षा सक्तीची केली आहे. मात्र, सरकारच्या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 26 एप्रिल रोजी घेण्यात येणाऱ्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांना ऑनलाईन आवेदनपत्र नियमित शुल्कासह भरण्यास १३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 28 फेब्रुवारीनंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अथवा ऑफलाईन आवेदनपत्र भरता येणार नाही याची नोंद घ्यावी, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.