BJP News : वरिष्ठांच्या नाराजीने फोडला घाम; बहुमत असूनही भाजपला 'महापौर' ठरविता येईना!

महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष असतानाही कोअर कमिटीत एकमत न झाल्याने भाजपाचा महापौर ठरू शकला नाही. प्रदेशाध्यक्ष चव्हाण नाराज असल्याची चर्चा.
BJP News : वरिष्ठांच्या नाराजीने फोडला घाम; बहुमत असूनही भाजपला 'महापौर' ठरविता येईना!
Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत स्वबळावर 57 नगरसेवक निवडून आणत बहुमताच्या काठावर असलेल्या भाजपामध्ये महापौर पदाच्या नावावरून एकमत होताना दिसत नाहीये. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत काल कोअर कमिटीची बैठक पार पडली, पण यात मंत्री अतुल सावे, खासदार डाॅ. भागवत कराड, आमदार संजय केनेकर, शहराध्यक्ष किशोर शितोळे, शिरीष बोराळकर, बसवराज मंगरुळे या सदस्यांना एक नाव ठरवता आले नाही. हे चित्र पाहून प्रदेशाध्यक्ष वैतागले, तुम्ही नाव ठरवून प्रदेशाकडे पाठवा असे सांगत त्यांनी बैठक आटोपती घेतली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकी दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतलेल्या टाॅक शो मध्ये महापालिकेतील कारभार हा पारदर्शक आणि स्वच्छ ठेवण्यावर आपला भर असले हे स्पष्ट केले होते. भाजपाने स्वबळावर सत्ता आणि बहुमताचा काठ गाठल्यामुळे आता अनुभवी आणि सभागृहाचे कामकाज हाताळू शकेल अशा व्यक्तीची महापौर पदावर निवड करण्यात येणार असल्याचे सांगीतले जाते. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपाचे एवढे नगरसेवक निवडून आहेत.

BJP News : वरिष्ठांच्या नाराजीने फोडला घाम; बहुमत असूनही भाजपला 'महापौर' ठरविता येईना!
TET Result : उद्याचे भविष्य घडवणारे 'मास्तर'च नापास? महा-टीईटीचा धक्कादायक निकाल! नापासांचा आकडा वाचून व्हाल थक्क!

यामध्ये काही नवखे तर बहुतांश नगरसेवक हे अनुभव दोन-तीन टर्म निवडून आलेले आहेत. अशावेळी महापौर पदासाठी एकाचे नाव निश्चित करणे कोअर कमिटीला कठीण जात आहे. त्यात पुन्हा सावे, कराड, केनेकर, शितोळे यांना आपल्या जवळची व्यक्ती या पदावर बसली पाहिजे, असे प्रयत्न सुरू आहेत. यातूनच महापौर पदाचे नाव निश्चित होत नसल्याची भाजपाच्या गोटात चर्चा आहे. भाजपाच्या प्रदेश कार्यालयात काल कोअर कमिटीच्या बैठकीवेळी समीर राजूरकर, शिवाजी दांडगे, राजगौरव वानखेडे, विजय औताडे, माधुरी अदवंत ही महापौर पदाच्या शर्यतीतील मंडळी उपस्थित होती.

या शिवाय भाजपमधील अनेकांची नावे महापौर पदाच्या शर्यतीत घेतली जात आहेत. यापैकी एकाच्या नावावर एकमत करून ते नाव प्रदेश कमिटीकडे येत्या एक-दोन दिवसात पाठवावेच लागणार आहे. 10 फेब्रुवारी रोजी महापौर, उपमहापौर पदाची निवड केली जाणार आहे. बहुमतासाठी एका नगरसेवकाची गरज भाजपाला लागणार आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने युतीचा महापौर होण्यात कुठल्याही अडचणी दिसत नाहीत. त्यामुळे आता प्रश्न फक्त महापौर कोण होणार? हाच आहे.

BJP News : वरिष्ठांच्या नाराजीने फोडला घाम; बहुमत असूनही भाजपला 'महापौर' ठरविता येईना!
EPFO चा धमाका: आता पीएफ क्लेमसाठी महिनाभर थांबायची गरज नाही; नवीन अपडेट एकदा वाचाच!

एमआयएमचा दावा किती खरा किती खोटा?

महापालिकेतील भाजपा आणि शिवसेना या महायुतीतील घटक पक्षांच्या महापालिकेतील एकत्रित नगरसेवकांची संख्या ही 70 म्हणजेच बहुमतापेक्षाही 12 ने जास्त आहे. त्यामुळे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी धक्का देण्याचा जो दावा केला आहे, तो फोल ठरण्याचीच अधिक शक्यता आहे. राज्यात युती असल्यामुळे शिवसेना महापालिकेत कुठलीही वेगळी भूमिका घेऊ शकत नाही. एमआयएमला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, वंचित आघाडीचे नगरसेवक सोबत घेऊनही बहुमतासाठीची मॅजिक फिगर गाठता येणार नाहीये. त्यामुळे इम्तियाज जलील यांचा दावा हा केवळ चर्चेत राहण्यासाठी केलेला प्रयोग असल्याचे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com