Ajit Pawar: पत्रकार परिषदेआधी महायुतीत मोठ्या हालचाली; CM शिंदे, फडणवीसांची दिल्लीत शाहांसोबत रात्री खलबतं? पण अजितदादा...

Mahayuti Seat Sharing : महाविकास आघाडीने रविवारी (ता.13) संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर आता महायुतीकडून सुद्धा संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे.विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता मंगळवारी (ता.15) जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर महायुतीची सुद्धा संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.
Amit Shah, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Amit Shah, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News: महाराष्ट्राला सध्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी तसेच सत्ता मिळवण्यासाठी प्रत्येक पक्षाची धडपड सुरु आहे. त्यासाठी भाजप,काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांकडून मोठी रणनीती आखली जात आहे. याचवेळी सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या चर्चांना वेग आला आहे.

याच धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Ajit Pawar) हे दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर येत होती. तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांची सोमवारी (ता.14) जागावाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याचीही चर्चा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजधानी दिल्लीत सोमवारी (ता.14) भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक होणार असल्याची माहिती आहे. यासाठी ते रात्री उशिरा दिल्लीला रवाना होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही सध्या दिल्लीत असल्याने तेही या बैठकीला उपस्थित राहण्याचे चिन्हे आहेत.

मात्र,आता उपमुख्यमंत्री अजित पवार आजच्या दिल्लीतील बैठकीसाठी जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे. आजची बैठक फक्त शिवसेना आणि भाजपच्या जागावाटपाबाबत होणार का असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात असल्याचंही सांगितलं जात आहे.

Amit Shah, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Ajit Pawar : ...अखेर ज्याची भीती होती, तेच घडलं!; फलटणमध्ये निंबाळकर अन् आमदार चव्हाणांनी तुतारी फुंकली

महाविकास आघाडीने रविवारी (ता.13) संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर आता महायुतीकडून (Mahayuti) सुद्धा संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे.विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता मंगळवारी (ता.15) जाहीर होण्याची शक्यता आहे.त्याच पार्श्वभूमीवर महायुतीची सुद्धा संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.

या पत्रकार परिषदेतून कोणती माहिती दिली जाणार? याकडे लक्ष असेल. अशातच आता महायुतीचे तीन प्रमुख नेत्यांची दिल्लीवारी आणि अमित शाहांसोबतच्या बैठकीच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. पण आता या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार जाणार नसल्याने महायुतीत जागावाटपावरुन अंतर्गत धुसफूस असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Amit Shah, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Sanjeevraje Nimbalkar News : शरद पवारांच्या पक्षात पाऊल ठेवताच संजीवराजे निंबाळकरांचा मोठा आरोप; म्हणाले,...

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लोणावळ्यात पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, महायुतीतील जागावाटपाचा तिढा हा तारीख पे तारीखमध्ये अडकला आहे. भाजप, शिंदे आणि अजित पवार गटात वाद-विवाद सुरु असल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे.

आठवले म्हणाले, आमच्या पक्षाला कमी जागा मिळाल्या तरी मी आम्ही दुसरा काही निर्णय घेणार नाही. आम्ही महायुती बरोबरच राहणार आहोत. राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, शिवाय संभाजीराजे आणि बच्चू कडू आमच्याविरोधात आहेत. त्यामुळे वेगळा निर्णय घेण्याची आमची भूमिका नाही. तीन पक्षात वाद विवाद सुरु आहेत, त्यामुळे जागा थोड्या कमी जास्त होतील. लवकरात लवकर जागांचा तिढा सुटेल, असा विश्वासही रामदास आठवले यांनी व्यक्त केला. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com