Ajit Pawar : ...अखेर ज्याची भीती होती, तेच घडलं!; फलटणमध्ये निंबाळकर अन् आमदार चव्हाणांनी तुतारी फुंकली

MLA Deepak Chavan And Sanjeevraje Nimbalkar Join NCP SharadChandra Pawar : इंदापूरनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मोठा धमाका केला आहे.
ramraje nimbalkar sharad pawar and ajit pawar.jpg
ramraje nimbalkar sharad pawar and ajit pawar.jpgSarkarnama
Published on
Updated on

Phaltan - Koregaon News : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन मोठे पक्ष फुटल्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे ही निवडणूक शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे.

या दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी कंबर कसली आहे. पवारांनी तर अजित पवार गटासह भाजपला एकावर एक धक्के देण्यास सुरुवातही केली आहे. त्यातच त्यांनी आता अजित पवारांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या फलटणमध्येच त्यांना मोठा धक्का दिला आहे.

इंदापूरनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मोठा धमाका केला आहे.फलटण- कोरेगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण (Deepak Chavan) आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सोमवारी(ता.14) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला.

अजित पवारांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर आमदार दीपक चव्हाण यांनी तुतारी फुंकल्याने हा महायुतीसह अजित पवारांना मोठा झटका मानला जात आहे. यातच आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी सध्या कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी त्यांचा महायुतीच्या प्रचारात कितपत रोल असेल याबाबत साशंकता आहे.

ramraje nimbalkar sharad pawar and ajit pawar.jpg
Jayant Patil : संजीवराजेंचा प्रवेश अन् जयंत पाटलांना अचानक रामराजेंची आठवण, म्हणाले 'आपला राम ...'

अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार दीपक चव्हाण आणि नेते संजीवराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती.अजित पवारांसह महायुतीला ज्याची भीती होती तेच अखेर फलटण- कोरेगावमध्ये घडल्याचं पाहायला मिळालं.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील, विजयसिंह मोहिते पाटील आदींच्या उपस्थितीत तुतारी फुंकली.यावेळी संजीवराजे, जयंत पाटील, खासदार कोल्हे यांनी आप आपल्या भाषणात सत्ताधारी महायुतीसह केंद्रातील नेतृत्वावरही सडकून टीका केली.

ramraje nimbalkar sharad pawar and ajit pawar.jpg
Harshvardhan Patil: वाजत गाजत 'तुतारी' हाती, पवारांकडून शब्द; तरी हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी 'डेंजरझोन'मध्येच; 'हे' आहे कारण

यावेळी संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करण्यामागची आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आपल्याला साम, दाम, दंड भेद सगळे वापरा असे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले आहे. मात्र, त्यांनी काहीही वापरले तरी आपण स्वाभिमानी आहोत. सातारा हा स्वाभिमानी आहे आणि दिल्लीवर राज्य करणारा सातारा जिल्हा आहे. त्यामुळे दिल्लीसमोर आम्ही झुकणारे नाही असा इशाराही त्यांनी दिला.

तसेच संजीवराजे यांनी भाजपचे वरिष्ठ नेते वेगळ्या प्रकारचे राजकारण करत आहेत. त्यामुळे आपल्याला वेगळा निर्णय घ्यावा लागल्याचा आरोपही यावेळी केला.त्याचबरोबर महाराष्ट्र आणि देशाला शरद पवारसाहेबांशिवाय पर्याय नसल्याचंही मतही व्यक्त केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com