

Ajit Pawar safety concerns : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात, हा घात असल्याची मोठी शंका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केली. आमदार पवार यांच्या या दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
'सीआयडी', अमेरिकेच्या 'एनडीएसबी' आणि फ्रान्सच्या 'बीईए'च्या उच्च संस्थाकडून चौकशीची मागणी करताना, विमान अपघातापूर्वी अजितदादांचे सार्वजनिक जीवनात वावरताना, विशेष करून सुरक्षिततेसंदर्भात बदलेल्या वर्तुणुकीवर लक्ष वेधलं.
जेव्हा केव्हा अजितदादांचे (Ajit Pawar) पूर्वीचे व्हिडिओ बघितले असतील, तेव्हा ते प्लास्टिकची बाॅटल घेऊन काही करताना बघितलं असेल, पाणी पिताना दिसले असतील, असे सांगताना रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत, स्टेजवर असलेल्या पाण्याच्या प्लास्टिकची आणि काचेच्या बाॅटली जवळ गेले. तिथं पाण्याने भरलेली प्लास्टिकची बाॅटलला छिद्र पाडून ठेवलं आणि तिथली काचेची बाॅटल हातात घेत रोहित पवारांनी मोठा दावा केला.
रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, जे काही झालं ते झालं! दादांच्या मनात गोष्ट आली असावी, कधीही, केव्हाही, काहीही होऊ शकतं. कारण गेल्या काही महिन्यात, दादा प्लास्टिक बाॅटलवरनं, काचेच्या बाॅटलवर आले होते. ते का काचेच्या बाॅटलवर आले होते? असा प्रश्न करत, याच्यात काही करू शकता येत नाही, याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधले.
नजीकच्या काळात काही व्हिडिओ बघितले, तर मागे सुरक्षारक्षक उभा असतो. तो देखील त्यांचा विश्वासू, त्याच्या हातात काचेची बाटली असते. ती काचेची बाटली बऱ्याचवेळा चेक केली जाते. हे सांगताना रोहित पवार यांनी हातातील काचेची बाटलीची, झाकणाकडची दिशा जमिनीकडे केली, म्हणजेच खालच्या दिशेने करून दाखवली. यानंतरच दादांच्या हातात बाटली दिसायची, असा दावा रोहित पवार यांनी केला.
रोहित पवार यांच्या या दाव्याने दादांना कोणापासून धोका होता का? असा प्रश्न या मुळे उपस्थित झाले आहेत. दादा प्लास्टिक बाटलीवरून काचेच्या बाटलीवर का आले? असा प्रश्न पडतो. तसेच रोहित पवार यांनी त्यांच्या मित्रांनी घेतलेल्या हेलिकाॅप्टरचा देखील किस्सा पत्रकार परिषदेत सांगत, अजितदादांच्या सुरक्षिततेविषयी मोठा दावा केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.