VIDEO : तानाजी सावंत यांचं 'ते' विधान जिव्हारी, अजितदादांच्या 'NCP'तील नेत्यांनी वाभाडे काढले; महायुतीतून बाहेर पडणार?

Tanaji Sawant Vs Ajit Pawar : तानाजी सावंत यांच्यासह अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीवर टीका करत उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. मात्र, महायुतीत राष्ट्रवादी सोबत आल्यानं तानाजी सावंत यांच्यासारख्या नेत्यांची गोची झाली आहे.
Tanaji Sawant | Ajit Pawar
Tanaji Sawant | Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी 2022 एकत्र येऊन महायुतीचं सरकार स्थापन केलं. 2023 मध्ये अजितदादा पवार यांनी महायुतीला पाठिंबा दिला. मात्र, महायुतीतील तीन पक्षांमध्ये सातत्यानं खटके उडल्याचं पाहायला मिळत आहे.

आता आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेते चांगलेच भडकले आहेत. त्यामुळे महायुतील सारं काही अलबेल नसल्याचं दिसून येत आहे.

मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यात, 'राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत बसल्यावर उलट्या होतात,' असं विधान तानाजी सावंत यांनी केलं आहे. सावंत यांच्या वक्तव्यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीतून संताप व्यक्त केला जात आहे.

राष्ट्रवादीचे ( अजितदादा पवार ) मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचं आवाहन अजितदादांना केलं आहे. तर, आमदार अमोल मिटकरी यांनीही सावंत यांचा समाचार घेतला घेतला आहे.

Tanaji Sawant | Ajit Pawar
Rajkot Fort Statue Collapse : 'एकदा नाही शंभरवेळा डोकं ठेवायला मी तयार' ; शिंदेंनी मागितली माफी!

तानाजी सावंत काय म्हणाले?

"राष्ट्रवादीसोबत आपले आयुष्यभर पटले नाही. आता मंत्रिमंडळात त्यांच्या मांडीला मांडी लावून बसावे लागते. मात्र, बैठकीनंतर बाहेर आल्यावर उलट्या होतात," असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी धाराशिवमधील एका मेळाव्यात केलं होतं.

तानाजी सावंत कोण आहेत?

सावंत यांच्या वक्तव्यानंतर उमेश पाटील यांनी तातडीनं प्रत्युत्तर दिलं आहे. "तानाजी सावंत यांचं वक्तव्य ऐकून घेण्याची आम्हाला अजिबात आवश्यकता नाही. असलं ऐकून घेण्यापेक्षा अजितदादांनी (Ajit Pawar) महायुतीतून बाहेर पडलेलं चांगलं. आपण सत्तेसाठी लाचार आहोत का? अशा पद्धतीनं बोलणारे तानाजी सावंत कोण आहेत? त्यांचा बोलण्याचा काय संबंध आहे? तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीला महायुतीत प्रवेश दिला का?" अशा प्रश्नांचा भडीमार उमेश पाटील केला आहे.

Tanaji Sawant | Ajit Pawar
BJP Politics : भाजपला गळतीचं टेन्शन, विधानसभा निवडणुकीसाठी धोक्याची घंटा

...तर राष्ट्रवादी काँग्रेस ऐकून घेणार नाही

"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं म्हणून तानाजी सावंत यांना मंत्री होता आलं. एकनाथ शिंदे यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मुख्यमंत्री केलं. त्याच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अजितदादा आणि राष्ट्रवादीला भाजपच्यासोबत घेतलं.

तानाजी सावंत हे बहुजन समाजातील शिक्षण क्षेत्रात काम केलेल एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत. मात्र, त्यांची वक्तव्य ऐकल्यानंतर आम्हालाही लाज वाटते. तानाजी सावंत किंवा अन्य कुणीही अशी वक्तव्य करत असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस ऐकून घेणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीनं विधाने करणाऱ्या तानाजी सावंत यांना बाहेर काढला अन्यथा आम्ही बाहेर पडू," असा इशारा उमेश पाटील यांनी दिला आहे.

...तर आमच्या 'एसटी'त कशाला बसता?

आमदार मिटकरी यांनी म्हटलं, "सावंतांना उलट्या कशामुळे होतात, हे एकनाथ शिंदे हेच सांगू शकतात. ज्यांचे पुतणे दुसऱ्या पक्षात जाण्याची इच्छा व्यक्त करतात, तेच अशा पद्धतीनं युतीत मिठाचा खडा टाकतात. मांडीला मांडी लावून जर मळमळ होत असेल, तर आमच्या 'एसटी'त कशाला बसता?"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com