BJP Politics : भाजपला गळतीचं टेन्शन, विधानसभा निवडणुकीसाठी धोक्याची घंटा

BJP core committee meeting News : मागील काही दिवसांपासून राज्यात घडत असलेल्या दुर्घटनांमुळे महायुती सरकार आणि खासकरून राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली जात आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

BJP News : महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha Election) भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. शिवाय लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांची (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधानसभेच्या उमेदवारीचा शब्द दिला होता.

मात्र, विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या तरीही जागावाटपा संदर्भात विचारणा होत नसल्याने आणि महायुतीत जागावाटपावरून आधीच रस्सीखेच आहे. त्यामुळे युतीत थांबल्यास तिकीट न मिळण्याच्या भीतीने अनेक नेते भाजपमधून बाहेर पडत आहेत.

याच सर्व पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या (BJP) प्रदेश कोअर कमिटीची बैठक उद्या शुक्रवारी (ता.29 ऑगस्ट) पार पडणार आहे. पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी बैठतीत चर्चा केली जाणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.

Devendra Fadnavis
Sharad Pawar : कोल्हापुरात शरद पवार तीन दिवसांत कुणाचा खेळ बिघडवणार? धक्के बसणार हे निश्चित...

मागील काही दिवसांपासून राज्यात घडत असलेल्या दुर्घटनांमुळे महायुती सरकार आणि खासकरून राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) टीका केली जात आहे. त्यामुळे भाजप काही दिवसांपासून बॅकफूटवर गेल्याचं बोललं जात आहे. या बॅकफूटवर गेलेल्या संघटनेला पुन्हा उसळी घेण्यासाठी काय काय करावं लागेल? तसंच आगामी विधानसभेसाठीची रणनीती काय असावी याबाबतचं विचारमंथन या बैठकीत होणार असल्याचीही माहिती आहे.

Devendra Fadnavis
Eknath Shinde On Deepak Kesarkar : 'घोषणा नको कृती करा...', CM शिंदेंकडून केसरकरांना समज; नेमकं प्रकरण काय?

भाजपचे केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ही कोअर कमिटीची बैठक पार पडणार आहे. त्यामुळे आता भाजपला देखील पक्षातील गळतीचं टेन्शन आल्याचं दिसत असून ही गळती रोखण्यात भाजपला यश येणार का हे देखील पाहणं महत्वाचं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com