Ajit Pawar Plane Crash: जय पवारांनी विमान मालकाचे बिंग फोडले, भुजबळही सरसावले; नेमका ‘तो’ मुद्दा खटकला...

Ajit Pawar aircraft incident AAIB report controversy: ‘एएआयबी’ने तपासलेला प्राथमिक अहवाल मी वाचला. हा अहवाल पूर्णपणे आणि सखोलपणे तयार न केल्याचे पाहून मला अत्यंत खेद आणि वेदना होत आहेत, असे जय पवार म्हणाले होते.
Jay Pawar exposes aircraft owner in Ajit Pawar plane crash case
Jay Pawar exposes aircraft owner in Ajit Pawar plane crash caseSarkarnama
Published on
Updated on

Jay Pawar statement, Chhagan Bhujbal reaction: बारामतीतील अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल एएआयबी संस्थेकडून नुकताच प्रसिध्द करण्यात आला. या अहवालावर अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी आक्षेप घेत केवळ औपचारिक माहिती नव्हे, तर सत्य, पारदर्शक आणि सर्वंकष उत्तरे मिळालीच पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. तसेच त्यांनी विमान कंपनीच्या मालकाचा विमानातील पायलट सीटवर झोपलेल्या अवस्थेतील एक व्हिडीओ पोस्ट करत खळबळ उडवून दिली होती.

जय पवार यांनी उघडपणे अहवालावर नाराजी व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनीही अहवालावर शंका उपस्थित केली आहे. विमान जमिनीवर कोसळण्याआधी झाडाला धडकले होते, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. भुजबळ यांनी नेमके त्यावरच बोट ठेवले आहे.

माध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले, विमान झाडावर आदळलं असं कुणीही म्हणाले नाही. विमानतळावर अजितदादांच्या स्वागताला शेकडो लोक जमले होते. तिथं कुणीही असं म्हणत नाही की, विमान झाडावर आदळले. त्यामुळे मला आश्चर्च वाटले. तिथे एकही माणूस भेटला नाही की जो असं सांगेल. कुणीतरी पाहिले असते ना. झाडाचंही थोडंफार नुकसान झाले असेल.

Jay Pawar exposes aircraft owner in Ajit Pawar plane crash case
Maharashtra government : महाराष्ट्र सरकारचा क्रांतीकारी निर्णय; 'त्या' नावांमधून हटविला मागासवर्गीय शब्द, शासन आदेश काढला...

भुजबळ यांनी पायलट सीटवर झोपलेल्या विमान कंपनीच्या मालकाच्या कृतीवरही नाराजी व्यक्त केली. पायलटच्या सीटवर पायलटच बसले पाहिजेत. त्याने न झोपता पूर्णपणे विमानाचा ताबा घेऊन विमान चालविले पाहिजे. तो मालक जर अशारीतीने झोपला असेल तर तो निष्काळजीपणा आणि मुजोरपणा आहे. त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे, अशी मागणी भुजबळांनी केली.

काय म्हणाले होते जय पवार?

‘एएआयबी’ने तपासलेला प्राथमिक अहवाल मी वाचला. हा अहवाल पूर्णपणे आणि सखोलपणे तयार न केल्याचे पाहून मला अत्यंत खेद आणि वेदना होत आहेत. महाराष्ट्रातील जनतेला तसेच या अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्व कुटुंबीयांना केवळ औपचारिक माहिती नव्हे, तर सत्य, पारदर्शक आणि सर्वंकष उत्तरे मिळालीच पाहिजेत, असे अपेक्षा जय पवारांनी व्यक्त केली आहे.

Jay Pawar exposes aircraft owner in Ajit Pawar plane crash case
Maharashtra IAS : फडणवीसांच्या टीममधील महिला अधिकाऱ्यासह 3 वरिष्ठ IAS थेट केंद्रात जाणार; 41 जणांच्या यादीत समावेश...

डीजीसीएने ज्या मुद्यांवर व्हीएसआर व्हेंचर्सची काही विमाने ग्राउंड केली आहेत, त्याच मुद्यांवर इतर विमानांमध्येही त्रुटी असण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. जर सुरक्षेसंदर्भातील नियम आणि प्रक्रियांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या असतील, तर केवळ काही विमानांपुरती कारवाई न करता संपूर्ण व्हीएसआर फ्लीटबाबत कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, आवश्यक असल्यास व्हीएसआरच्या संपूर्ण विमान ताफ्याचे पूर्णपणे संचालन बंद करण्याचाही डीजीसीएने विचार करण्यात यावा, अशी मागणी जय पवारांनी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com