Jay Ajit Pawar : मोठी बातमी : रोहित पवारांच्या सततच्या आरोपांनंतर जय अजित पवार पहिल्यांदाच थेट बोलले; आता वादळ उठणार?

Jay Pawar responds to allegations : महाराष्ट्रातील जनतेला आपल्या हृदयाला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेचे संपूर्ण, पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे, असे जय पवार यांनी म्हटले आहे.
Jay Ajit Pawar
Jay Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Aircraft incident investigation demand : विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनानंतर काही नेत्यांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार व अजितदादांचे पुतणे यांच्याकडून पत्रकार परिषदांमधून अनेक आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. अजितदादांचा अपघात नसून घातपात असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी विविध मुद्दे मांडत या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणीही केली आहे.

रोहित पवार यांच्याकडून होत असलेल्या आरोपांवरून राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनीही रोहित पवार यांची मागणी उचलून धरली आहे. पण आतापर्यंत रोहित पवारांच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार किंवा जय पवार यांच्याकडून कोणतीही थेट प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. आज जय पवार यांनी सोशल मीडियात याबाबत पोस्ट केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

काय म्हटले जय पवारांनी?

ब्लॅक बॉक्सचे नुकसान झाल्याची बातमी पुढे आल्यानंतर संशयाचे धुके अधिक गडद होऊ लागले आहे. त्यावर आजच रोहित पवारांनीही भाष्य केले होते. त्यानंतर आता जय पवार यांनीही विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे.

Jay Ajit Pawar
Congress News : बड्या नेत्याची काँग्रेसला सोडचिठ्ठी, लगेच राहुल गांधींचा फोन; मुख्यमंत्र्यांनी थेट घर गाठलं, भाजपमध्ये प्रवेश ठरला...

महाराष्ट्रातील जनतेला आपल्या हृदयाला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेचे संपूर्ण, पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे. व्हीएसआरला तात्काळी उड्डाणे चालविण्यास बंदी घालून, त्यांच्या विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गंभीर गैरव्यवहाराबद्दल सखोल आणि निष्पक्ष चौकशी केलीच पाहिजे. मिस यू डॅड, अशी पोस्ट जय पवार यांनी केली आहे.

image-fallback
IAS in Bihar : धडाकेबाज मराठमोळ्या IAS अधिकाऱ्याला बिहारमध्ये विरोधकांनी घेरलं; सरकार ठामपणे बाजूने उभे...

जय पवार यांनी एकप्रकारे रोहित पवार यांच्या भूमिकेशी सुसंगत भूमिका घेत अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. तसेच व्हीएसआर या विमान कंपनीच्या उड्डाणांवरही बंद घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. रोहित पवार यांच्याकडूनही सुरूवातीपासूनच ही मागणी केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com