Uddhav Thackeray : विधिमंडळ परिसरातून मोठी बातमी: पुन्हा दिशा सालियनचा मुद्दा अन् ठाकरे भडकले; म्हणाले,'हरामखोर आहेत ते...'

Disha Salian Case : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बुधवारी विधानभवनात दाखल झाले.यावेळी त्यांचा आमदार वरुण सरदेसाई यांच्याशी चर्चा करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उद्धव ठाकरे हे आपल्या काही आमदारांसह विधानभवनात प्रवेश करत होते.यावेळी सभागृहात दिशा सालियन प्रकरणावरुन झालेल्या गदारोळावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आमदार वरुण सरदेसाई यांच्याशी चर्चा करत होते. याचवेळी त्यांनी हरामखोर आहेत ते असं विधान केलं आहे. या त्यांच्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बुधवारी (ता.26) विधानभवनात दाखल झाले.यावेळी त्यांचा आमदार वरुण सरदेसाई यांच्याशी चर्चा करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत त्यांनी हरामखोर आहेत ते सगळे असा उल्लेख केला आहे. या त्यांच्या विधानावर राजकीय क्षेत्रातून उलटसुलट प्रतिक्रिया समोर येत आहे.

याचवेळी वरुण सरदेसाई हे दिशा सालियन (Disha Salian) प्रकरणावरुन सभागृहात झालेल्या गदारोळाची माहिती उद्धव ठाकरे यांना देत होते. याचवेळी ठाकरेंनी हे प्रकरण सभागृहात कुणी काढलं अशी विचारणा सरदेसाईंकडे केली. याविषयी सरदेसाईंनी त्यांना सभागृहातील माहिती देताच ठाकरेंनी हरामखोर आहेत ते असं म्हटलं. त्यांचा रोख सत्ताधारी पक्षातील दिशा सालियन प्रकरण उचलून धरणाऱ्या नेत्यांवर असल्याचं बोललं जात आहे.

Uddhav Thackeray
MNS News : ...तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, मनसेच्या माजी आमदाराचा सत्ताधाऱ्यांना इशारा

यावर राम कदम म्हणाले, सुशांतसिंग राजपूतचा जिथं मृत्यू झाला,तो फ्लॅट उद्धव ठाकरे सरकारने लगेच का परत रिनोव्हेट केला.घराच्या भिंतींना रंगकाम,कुलुपं खिडक्या,दारं रातोरात बदलली गेली.तसेच बिहारहून सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशीसाठी आलेल्या पोलिसांनाही परवानगी नाकारली. ते पोलिसच होते ना,लष्कर ए तोयबाचे अतिरेकी तर नव्हते. पण त्यांना चौकशी न करताच परत पाठवण्यात आल्याचंही कदम म्हणाले.

खरंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सुशांतसिंग राजपूत किंवा दिशा सालियन प्रकरणाची चौकशी करा असं म्हटलं पाहिजे होतं. करा चौकशी आम्ही घाबरत नाही,असं म्हणायला पाहिजे होतं. पण ही मंडळी चौकशी करु नका म्हणत आज बेलमध्ये उतरले होते, असंही राम कदम यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

Uddhav Thackeray
Jayant Patil News : नार्वेकरांच्या मनपरिवर्तनासाठी जयंत पाटलांची बॅटिंग; भास्कर जाधवांचा निर्णय आजच होणार?

तसेच रिया चक्रवर्तीचे प्रवक्ते हे उबाठाचे नेते, महाविकास आघाडी सरकार, रिया चक्रवर्ती यांची लिंक आहे, असा आरोपही राम कदम यांनी केला. त्याचमुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आमदार कदम यांनी केली होती.

दिशा सालियनच्या कुटुंबाला जसं इतकी वर्षे धमकावून ठेवलं होतं.कुणी धमकावून ठेवलं होतं. हे आता समोर आलं आहे. तिचेच वडील आता आपल्या मुलीला न्याय द्या असं म्हणत आहेत.तसंच सुशांतसिंग राजपूतच्या कुटुंबालाही न्याय देण्याच्या उद्देशानं आज वाटचाल सुरू झाल्याचंही कदम यांनी यावेळी सांगितले.

Uddhav Thackeray
Ajit Pawar : एकनाथ शिंदेंना गद्दार म्हणण्यावर अजितदादांनी दिले स्पष्टीकरण, 'त्या वेळी मी... '

सभागृहात आमदार राम कदम यांच्या आरोपांनंतर आमदार वरुण सरदेसाई म्हणाले,राम कदम यांनी ड्रामा करुन सांगितलं. पण केंद्र सरकारकडे सीबीआय आहे,त्यांनी चौकशी केली आणि क्लिनचीट दिली. मग सीबीआयवरती आपला आरोप आहे का? आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे,असे आमदार वरुण सरदेसाई यांनी म्हटले.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई पोलीस यांची भेट घेतली आहे.या संदर्भात चौकशी केली जाईल.सर्व संबंध तपासले जातील.पाच वर्षांपूर्वी उघड झालं नाही ते आता उघड होत असेल तर न्याय दिला पाहिजे,असे मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले. तसेच, उद्धव ठाकरेसाहेब यांनी आम्हाला सांगितल होतं, ⁠माता बहिणींवरती अन्याय करायचा नाही, ती शिकवण अजूनही कायम आहे. म्हणून, त्या महिलेला न्याय दिला पाहिजे, असेही मंत्री देसाई यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com