Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर अजितदादांचे मोठे विधान; म्हणाले, 'तेव्हा आम्ही एकत्र...'

NCP factions merger News : राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्यासंदर्भात चर्चा सुरु आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही पक्षांतील महत्त्वाच्या नेत्यांनी एकत्र येण्यावर त्यांची मते व्यक्त केली आहेत.
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याच्या राजकारणात उद्धव व राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र येण्याच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्यासंदर्भात चर्चा सुरु आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही पक्षांतील महत्त्वाच्या नेत्यांनी एकत्र येण्यावर त्यांची मते व्यक्त केली आहेत. त्यातच आता एकत्र येण्याच्या विषयावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे. कुटुंब म्हणून कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही एकत्र येतोच, असे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांत अजित पवार आणि शरद पवार (Sharad Pawar) हे अनेकवेळा एकत्र आले आहेत. त्यासोबतच वेगवेगळ्या कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने तसेच इतर बैठकांत शरद पवार आणि अजित पवार एकमेकांच्या आजूबाजूला बसलेले पाहायला मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील अशा चर्चा रंगल्या आहेत.

Sharad Pawar, Ajit Pawar
Uddhav Thackeray : मंत्र्यांना मराठीचा अपमान करण्याचा परवाना मिळाला का? बाळासाहेबांच्या संघर्षावर दारूच्या गुळण्या टाकण्याचे काम चालवलयं

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षातील काही नेत्यांनी एकत्रीकरणविषयी थेटपणे भावना व्यक्त केल्या आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटातील नेते मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मला आनंदच होईल, अशी भावना व्यक्त केली आहे.

Sharad Pawar, Ajit Pawar
Mahayuti alliance : विधानसभेचे विरोधक झाले महायुतीचे भागीदार; मेगाभरतीमुळे मित्रपक्षातच पडणार ठिणगी !

यावेळी प्रसार माध्यमाशी बोलताना अजित पवार यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्याच वेळी भविष्यात अजित पवार आणि शरद पवार यांचे दोन्ही पक्ष एकत्र येतील का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजितदादा थेट उत्तर देताना म्हणाले, 'माझ्या मुलाच्या साखरपुड्याला सगळे एकत्र आलो होतो. घरातले कार्यक्रम असतील तर आम्ही जातोच. तसेच, विचारधारा वेगवेगळी आहे. पण कुटुंब म्हणून सुख दुखा:त आम्ही एकमेकांसोबत असतोच,' असेही स्पष्ट केले.

Sharad Pawar, Ajit Pawar
Mahayuti Government : महायुती सरकारमध्ये मंत्रीच अस्वस्थ, अधिकार मिळेनात? CM फडणवीसांना साकडे!

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना या एकत्रिकरणाबाबत विचारण्यात आले होते. त्यांनी मला काहीही माहिती नाही, असे उत्तर दिले होते. आता अजित पवार यांनीही कौटुंबिक कार्यक्रमात आम्ही एकत्र येतोच, असे भाष्य केले आहे. त्यामुळे येत्या काळात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Sharad Pawar, Ajit Pawar
Ajit Dada advice Kokate : वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कोकाटेंना अजितदादांचा सल्ला पचनी पडणार का ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com