Harshal Patil Case : 'हर्षल पाटील सब कॉन्ट्रॅक्टर.. शासन त्याचे देणे लागत नाही', जलजीवनची बिल थकवल्याच्या आरोपांवर अजितदादांचं उत्तर

Ajit Pawar On Harshal Patil Suicide Case : सांगली जिल्ह्यातील युवा कंत्राटदार हर्षल पाटील याने गळफास घेत आत्महत्या केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. यामुळे पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेमुळे निधीची होणाऱ्या पळवापळवीची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान या आत्महत्येवर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
Ajit Pawar Harshal Patil Suicide Case
Ajit Pawar Harshal Patil Suicide Casesarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात बातमीचा सारांश :

  1. अजित पवार यांनी स्पष्ट केलं की हर्षल पाटील यांना शासनाने थेट कंत्राट दिले नव्हते, ते सब-कॉन्ट्रॅक्टर होते.

  2. त्यामुळे त्यांच्या बीलाचा विषय हा सरकारचा नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

  3. घटना दुर्दैवी असल्याचं नमूद करत त्यांनी सांगितलं की सध्या पोलीस याची चौकशी करत असून सत्य लवकरच समोर येईल.

Sangli News : सांगलीच्या हर्षल पाटील नावाच्या तरूण सरकारी कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. जल जीवन मिशनचे काम करूनही तब्बल 1.40 लाख रुपयांचे थकीत बील न मिळाल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आता होत आहे. अशातच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी हर्षल पाटील यांच्या आत्महत्येबाबत स्पष्टीकरण देताना, हर्षल पाटील यांचे कोणतेच बील थकीत नसून त्याला जिल्हा परिषदेकडून कोणतेही काम देण्यात आलेले नाही, असे म्हटलं होतं. यादरम्यान आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेवर भाष्य केलं असून ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटलं आहे. (Harshal Patil Sangli suicide due to pending payment for Jal Jeevan Mission work and Ajit Pawar’s clarification on government contract link)

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी गावातील युवा कंत्राटदार हर्षल पाटील याने शेतात गळफास घेत आत्महत्या केली. हर्षलच्या आत्महत्येनंतर विरोधी पक्षांकडून सरकारला टार्गेट केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावरून सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. यामुळे आता हे प्रकरण चांगलेच तापलेलं आहे.

Ajit Pawar Harshal Patil Suicide Case
Gulabrao Patil On Harshal Patil Suicide : हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, मंत्री गुलाबराव पाटलांनी जाहीर केलं, 'एक रुपयाचंही बील...'

दरम्यान या प्रकरणावर अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हर्षल पाटीलला सरकारने कंत्राट दिले नव्हते, तो सब कॉन्ट्रॅक्टर होता. त्यामुळे त्याच्या पैसांचे काय झाले याच्याशी सरकारचा काहीच संबंध नाही. पण जी घटना घडली ती दुर्दैवी आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून याची खरी माहिती समोर येईल असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

मुंबईत पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले, सकाळी अधिकाऱ्यांकडे याची माहिती घेतलीय. त्या प्रमाणे सरकारने कंत्राट हे हर्षल पाटीलला दिले नव्हते. ते एका कॉन्ट्रॅक्टरला दिले होते. त्या कॉन्ट्रॅक्टरने सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून हर्षल पाटीलला नेमलं होते. त्यामुळे त्याच्याशी आमचा थेट संबंध येत नाही. मूळ कंत्राटदाराने बिले पाठवल्यानंतर सरकार त्याचे पैसे देतं. मात्र सब कॉन्ट्रॅक्टरला पैसे देण्याचा अधिकार आमचा नाही. तसेच मूळ कॉन्ट्रॅक्टर आणि सब कॉन्ट्रॅक्टर यांच्यात काय झालं हे देखील आम्हाला माहिती नाही.

जल जीवन ही केंद्र सरकारची योजना असून यात केंद्राचा 50 टक्के आणि राज्य सरकारचा 50 टक्के असा वाटा असतो. आम्ही त्यांना कंत्राट दिलं नव्हतं. तरी पण एखाद्या व्यक्तीचा जीव जाणं किंवा त्याने आत्महत्या करणं हे दुर्दैवी आहे. आता या प्रकरणामागच्या कारणांचा शोध पोलिस घेतील. त्याच्या मोबाईल तपासला जात असून त्याचं कोणाशी बोलणं झालं होतं याचा शोध घेतला जाईल. तसेच त्याने काही लिहून ठेवलं आहे का, याचीही माहिती पोलीस यंत्रणा मिळवत आहे.

दरम्यान या प्रकरणात आता सांगली जिल्हा परिषदेने देखील खुलासा केला आहे. जल जीवन मिशन अंतर्गत कोणत्याही कामाचा करारनामा हर्षल पाटील याच्याबरोबर केलेला नाही. त्यामुळे त्यांची जल जीवन मिशन अंतर्गत देयक प्रलंबित असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच जिल्हा परिषद सांगलीच्या उपलब्ध अभिलेखानुसार सदर व्यक्ती ही कंत्राटदार म्हणून नोंदीत असल्याचे दिसून येत नसल्याचे स्पष्टीकरण जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी खुलासा केला आहे.

Ajit Pawar Harshal Patil Suicide Case
Harshal Patil : "फडणवीस अन् 2 डेप्युटींनी राज्याचं स्मशान केलंय..."; सांगलीतील कंत्राटदाराच्या आत्महत्येवरून ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल

पडणारे प्रश्न :

1. हर्षल पाटील यांना शासनाचं कंत्राट होतं का?
– नाही, ते सब-कॉन्ट्रॅक्टर होते. अजित पवारांनी सांगितलं की शासनाचा त्यांच्याशी थेट संबंध नव्हता.

2. आत्महत्येचं कारण काय आहे?
– थकीत बील (₹1.40 लाख) वेळेवर न मिळाल्यामुळे आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे.

3. अजित पवार यांची काय प्रतिक्रिया आहे?
– त्यांनी ही घटना दुर्दैवी म्हटली असून सरकारचा थेट संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

4. पोलिस तपास सुरू आहे का?
– होय, पोलिस तपास सुरू असून लवकरच सर्व माहिती समोर येईल, असं अजित पवार म्हणाले.

5. याप्रकरणात दोषी कोण आहे?
– तपासाअंती हे स्पष्ट होईल. सध्या सब-कॉन्ट्रॅक्टर आणि मुख्य कंत्राटदार यांच्यामधील व्यवहार केंद्रस्थानी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com