Delhi : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपवर काँग्रेस नेते सडकून टीका करत आहेत. 'ज्यांच्यावर आरोप करण्यात येत होते, त्यांनाच भाजप पक्षात घेत आहे. भाजपने शिवसेना फोडली आणि दुसरा हल्ला झारखंडमध्ये केला. अजित पवारांवर आरोप केले. त्यांना तुरुंगात पाठवण्याची भाषा केली. आता त्यांनाच उपमुख्यमंत्री केले. भाजप घाबरला आहे म्हणून पक्ष फोडत आहे,' अशी टीका अलका लांबा यांनी भाजपवर केली.
'अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे आमचे मुख्यमंत्री असताना भाजपने त्यांच्यावर आरोप केले. भाजपने दोन पर्याय त्यांना दिले, जेलमध्ये जा किंवा भाजपमध्ये या. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले. त्यांनी जेलमध्ये जायला हवे होते,' असे म्हणत चव्हाण यांच्या भाजप (BJP) प्रवेशावर अलका लांबा यांनी नाराजी व्यक्त केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
इलेक्टोरल बॉण्ड योजना बेकायदा आणि असंविधानिक असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला. त्यामुळे इलेक्टोरल बाॅण्डच्या माध्यमातून राजकीय पक्षांना निधी घेता येणार आहे. भाजप सरकारने ही योजना आणली होती. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय सरकारला झटका मानला जात असताना काँग्रेसच्या महिला कमिटीच्या अध्यक्षा अलका लांबा यांनी यावर भाष्य केले .
सुप्रीम कोर्टाने आज इलेक्ट्रॉल बाॅण्डबद्दल घेतलेल्या निर्णायाचे काँग्रेस स्वागत करत आहे. मी सुप्रीम कोर्टाचे अभिनंदन करते, की त्यांनी हा निर्णय घेतला. आता सत्तेमधून राजकारण्यांना किती पैसे मिळाले हे स्पष्ट होईल, असा टोला अलका लांबा यांनी भाजपला लगावला. केंद्रातील भाजप सरकारला 10 वर्षे झाली. मात्र, जे काही काम केले नसल्याने लोकांना काय सांगणार म्हणून ते घाबरत आहेत, असेदेखील लांबा म्हणाल्या.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन करण्याचे आश्वासन सरकारने केले. मात्र, मागील दहा वर्षांमध्ये काहीच केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली, असा टोला लांबा यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला. आश्वासनाच्या पलीकडे सरकार काही करत नाही, असेदेखील लांबा म्हणाल्या.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.