

Mumbai News : राज्यातील राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलनीकरणाच्या चर्चेने जोर धरला आहे. त्यामुळे राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर जयंत पाटलांना अर्थमंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
त्यातच या चर्चेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते व आमदार अंबादास दानवे यांनी मोठे विधान केले आहे. जयंत पाटील यांच्या अर्थमंत्रिपदाबाबत शिंदे, फडणवीसांच्या हातात काहीच नाही, सर्व काही दिल्लीतील नेते ठरवितात असे स्पष्ट केले. एकनाथ शिंदे स्वतःचच स्वतः काही ठरवू शकत नाही, तर अर्थ खात्याचं काय ठरवतील? त्यामुळे हे सर्व दिल्लीतच ठरेल, असे दानवे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे देखील उपस्थित होते. त्यानंतर जयंत पाटील यांनी गुरुवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.
अर्थ खाते कोणाला द्यायचं हे एकनाथ शिंदे (Eknath shinde) किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या हातात अजिबात नाही. हे सर्व दिल्लीच्या हातात आहे. शिंदे स्वतःचच स्वतः काही ठरवू शकत नाही, तर मग फायनान्स खात्याचं काय ठरवतील? त्यामुळे हे सर्व दिल्लीतच ठरेल, असेही यावेळी दानवे यांनी स्पष्ट करीत त्यांनी सध्या सुरु असलेल्या चर्चेतील हवाच काढली आहे.
राज्यात सुरू असलेल्या या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी मोठे विधान केले आहे. शरद पवार यांचा पक्ष आतापर्यंत भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्यासारख्या प्रतिगामी शक्तींसोबत लढत राहिला आहे आणि सत्तेच्या एखाद्या तुकड्यासाठी ते तिथे जातील, असे मला आता तरी वाटत नाही, पण कोणाच्या मनात काय आहे हे आत्ताच्या घडीला सांगता येत नाही. हेही राजकीय दृष्ट्या तितकच खरे असल्याचे यावेळी दानवे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.