Amit shah : अमित शाह यांच्या दौऱ्यात एकनाथ खडसे उपस्थित राहणार? रावसाहेब दानवेंनी दिलं खरं उत्तर

Raosaheb Danve Amit shah assembly elections : रावसाहेब दानवे म्हणाले, एकनाथ खडसे पदाधिकारी नाहीत. त्यामुळे अमित शाह यांच्या दौऱ्यात नसतील. एकनाथराव बैठकीला अपेक्षित नाही. अनेक नेते पदाधिकारी नाहीत त्यांना निमंत्रण सुद्धा नाही.
Amit Shah Kolhapur tour
Amit Shah Kolhapur tourSarkarnama
Published on
Updated on

Amit Shah News: लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक फटका मराठवाड्यात बसला. मराठा आंदोलामुळे भाजपला मराठवाड्यात खातेही खोलता आले नाही. मात्र, गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र विधानसभेची रणनीती ठरवण्यास सुरुवात केली आहे. अमित शाह हे 24 सप्टेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत.

अमित शाह हे बुधवारी संभाजीनगरमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. तसेच संभाजीनगरमध्ये मुक्कामी देखील असणार आहेत. महायुतीचे सरकार पु्न्हा आणण्यासाठी अमित शाह यांनी लक्ष घातले असल्याचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

एकनाथ खडसे भाजप प्रवेशाच्या तयारीत आहेत. मात्र,त्यांना अजुनही भाजपमध्ये प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे ते अमित शाह यांच्या दौऱ्यावेळी उपस्थित राहणार का? असा प्रश्न विचारला जातो आहे. खडसेंच्या उपस्थिती विषयी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, एकनाथ खडसे पदाधिकारी नाहीत. त्यामुळे ते नसतील. एकनाथराव बैठकीला अपेक्षित नाही. अनेक नेते पदाधिकारी नाहीत त्यांना निमंत्रण सुद्धा नाही. खडसेंच्या पक्ष प्रवेशाच्याबाबत मी अधिक सांगू शकत नाही.

Amit Shah Kolhapur tour
VIDEO : वडीगोद्री येथे ओबीसी आणि मराठा समाजाचे कार्यकर्ते आमने-सामने, एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी अन्...

दानवे म्हणाले, अमित शाह 24 तारखेला महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे. नागपूरला कार्यकर्त्याची बैठक घेणार आहेत. तर 25 तारखेला नाशिक शहरात येणार आहेत. त्यांनतर कोल्हापूरला जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात चार बैठका होणार आहे. या बैठकीला 750 ते 900 कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. विधानसभेच्या तयारीसाठी अमित शाह मार्गदर्शन करणार आहेत.

Amit Shah Kolhapur tour
Rahul Jagtap : 'वस्ताद'कडून विजयाचा फिक्स शब्द घेतला; आता राहुल जगताप 'डाव' टाकणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com